स्वाइन फ्लूवर होमिओपॅथीचा उतारा !

By Admin | Updated: February 21, 2015 03:26 IST2015-02-21T03:26:26+5:302015-02-21T03:26:26+5:30

राज्यासह देशात थैमान घातलेल्या स्वाइन फ्लूला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने होमिओपॅथिक औषधांचा आग्रह धरण्याची मागणी होमिओपॅथिक पदवीधर संघटनेने केली आहे.

Homeopathic swine flu vaccine! | स्वाइन फ्लूवर होमिओपॅथीचा उतारा !

स्वाइन फ्लूवर होमिओपॅथीचा उतारा !

मुंबई : राज्यासह देशात थैमान घातलेल्या स्वाइन फ्लूला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने होमिओपॅथिक औषधांचा आग्रह धरण्याची मागणी होमिओपॅथिक पदवीधर संघटनेने केली आहे. अ‍ॅलोपॅथिक लॉबीच्या दबावामुळे शासन केवळ अ‍ॅलोपॅथिक औषधांचा प्रचार-प्रसार करीत असल्याचा आरोप संघटनेने शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला
आहे.
संघटनेचे सरचिटणीस डॉ. अन्वर आमीर म्हणाले, की अ‍ॅलोपॅथिक औषधांच्या तुलनेत होमिओपॅथिक औषधे अधिक माफक दरात उपलब्ध होतात. मात्र मुंबई, ठाणे आणि पुणेसारखी महानगरे वगळता इतर ठिकाणी या औषधांचा म्हणावा तितका पुरवठा होत नाही. शासनाचा राजाश्रय मिळाल्यास होमिओपॅथिक औषधांचा पुरवठा वाढू शकतो; शिवाय खूपच माफक दरात नागरिकांचे उपचार होऊ शकतात. १९१८ साली देशात स्वाइन फ्लूची साथ
आली असता होमिओपॅथिक औषधांच्या साहाय्यानेच पळविण्यात आली होती.
अ‍ॅलोपॅथिक औषधांच्या तुलनेत होमिओपॅथिक औषधे खूपच धीम्या गतीने काम करतात, हा केवळ गैरसमज असल्याची माहिती डॉ. प्रमोदिनी पागे यांनी दिली. पागे म्हणाल्या की, उलट स्वाइन फ्लूसाठी असलेल्या होमिओपॅथिक औषधांचे सेवन केल्यास दीड ते दोन तासांत त्यांचा प्रभाव सुरू होतो. शिवाय स्वाइन
फ्लू झालेला रुग्णही केवळ आठ दिवसांत बरा होतो. त्यामुळे केवळ सरकारचा राजाश्रय मिळाल्यास तातडीने स्वाइन फ्लूवर नियंत्रण मिळवता येईल.
देशात आतापर्यंत ११ हजारांहून अधिक रुग्णांमध्ये स्वाइन फ्लूचे सकारात्मक विषाणू आढळले आहेत. त्यांपैकी ७०० रुग्णांना या आजाराने जीव गमवावा लागला आहे.
त्यामुळे स्वाइन फ्लू तत्काळ
नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने होमिओपॅथिक औषधांचा आग्रह धरण्याचे आवाहन संघटनेने केंद्रीय आरोग्यमंत्री आणि आरोग्य मंत्रालयाला केले आहे. तसा पत्रव्यवहारही करण्यात आला
आहे; शिवाय राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि सचिव यांनाही निवेदन देण्यात आल्याचे संघटनेने सांगितले.

१० रुपयांत पळवा स्वाइन फ्लू !
रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवून स्वाइन फ्लूला प्रतिबंध करण्याचे काम अ‍ॅकोनाइट, अर्सेनिक अल्बा आणि अवियारे ही होमिओपॅथिकची तीन औषधे करतात. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचा खर्च १० रुपयांपेक्षा कमी आहे. परिणामी, सहज आणि माफक दरात उपलब्ध होणारी उपचार यंत्रणा म्हणून प्रशासनाने होमिओपॅथीचा आग्रह धरण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.

Web Title: Homeopathic swine flu vaccine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.