घरखरेदीच्या आमिषाने फसवणूक
By Admin | Updated: April 25, 2017 01:51 IST2017-04-25T01:51:27+5:302017-04-25T01:51:27+5:30
अल्प दरात सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या सरोजकुमार विरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात पाच शिक्षकांनी तक्रार

घरखरेदीच्या आमिषाने फसवणूक
ठाणे : अल्प दरात सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या सरोजकुमार विरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात पाच शिक्षकांनी तक्रार केल्यानंतर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात त्याच्याच विरुद्ध आणखी तिसरी तक्रार पाच वर्षांनी दाखल झाली आहे.
सरोज सिंग आणि श्यामराव शिंदे या दोघांनी घोडबंदर रोडवरील चितळसर मानपाडा भागात राहणाऱ्या एका महिलेला ३० डिसेंबर २०११ ते ४ डिसेंबर २०१२ या काळात सदनिका देण्याच्या नावाखाली रोख आणि धनादेशाने १६ लाखांची रक्कम घेतली. मात्र, त्याने पैसे किंवा सदनिकाही न देता पलायन केले. लोकमान्यनगर भागातील अनेकांकडून लाखो रुपये उकळले. त्याची
ओळख पटवून वर्तकनगर पोलिसांनी त्याला अटक केल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पाच शिक्षकांच्या गटानेही
वर्तकनगर पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल केला. तर २० एप्रिलला
वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात
सिंग आणि शिंदे यांच्याविरोधात तिसरी तक्रारही दाखल झाली
आहे. (प्र्रतिनिधी)