टीबी झाल्यास डॉक्टरांना सुटी
By Admin | Updated: January 28, 2015 01:31 IST2015-01-28T01:31:34+5:302015-01-28T01:31:34+5:30
कामाचा ताण, जेवायला वेळ न मिळणे, राहण्याच्या जागी खेळती हवा नसणे, एकाच खोलीत तीन ते चार जणांना राहावे लागणे,

टीबी झाल्यास डॉक्टरांना सुटी
मुंबई : कामाचा ताण, जेवायला वेळ न मिळणे, राहण्याच्या जागी खेळती हवा नसणे, एकाच खोलीत तीन ते चार जणांना
राहावे लागणे, अशी स्थिती असते निवासी डॉक्टरांची. याचबरोबर रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना टीबीची बाधा होते. टीबीची बाधा झालेल्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांना यापुढे हक्काची रजा मिळावी म्हणून राज्याच्या आरोग्य विभागात हालचाली सुरू आहेत. जानेवारीअखेरपर्यंत यासंदर्भातील पत्रक रुग्णालयांना पाठवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)