ईद-ए-मिलादनिमित्त सार्वजनिक सुट्टीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी ही सुट्टी दिली होती. त्याऐवजी आता ८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे.सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय फक्त मुंबई व उपनगर जिल्ह्यासाठी आहे.
मुंबई व उपनगरात शुक्रवारची सुट्टी सोमवारी देण्यात आली आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे.
गणपती विसर्जनामुळे मुस्लिम समुदायाने मिरवणुकीचा कार्यक्रम पुढे ढवळूनसोमवारी ८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारची सुट्टी सोमवारी देण्यात येणार आहे. मात्र हा निर्णय फक्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगरापुरता मर्यादित आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी ५ सप्टेंबर २०२५ ची सुट्टी कायम ठेवणार असल्याचे पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे.
शनिवारी ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण आहे. राज्यात बंधुता आणि हिंदू -मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी मुस्लिम समुदायाने जुलूसचा कार्यक्रम ८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर व उपनगरातील शासकीय कार्यालये ५ सप्टेंबर रोजी नियमित सुरू राहतील, अशी माहिती यातून दिली आहे.
या ठिकाणी असणार सुट्टीचा बदल
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ८ सप्टेंबर रोजी असणार आहे. इतर सर्व जिल्ह्यांसाठी मात्र यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ५ सप्टेंबर रोजीच सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात व राज्यातील इतर जिल्ह्यांतील शासकीय कार्यालये ५ सप्टेंबर रोजी बंद राहतील.