गे लोकांमुळे एचआयव्हीचा प्रसार!

By Admin | Updated: March 24, 2015 01:38 IST2015-03-24T01:38:56+5:302015-03-24T01:38:56+5:30

गे लोकांमुळे एचआयव्हीचा प्रादुर्भाव जास्त होतो, असे वादग्रस्त वक्तव्य करून अशा लोकांच्या मानसिक समुपदेशनासाठी एनजीओना सरकारतर्फे अनुदान देण्यात येईल,

HIV spread due to gay people! | गे लोकांमुळे एचआयव्हीचा प्रसार!

गे लोकांमुळे एचआयव्हीचा प्रसार!

मुंबई : गे लोकांमुळे एचआयव्हीचा प्रादुर्भाव जास्त होतो, असे वादग्रस्त वक्तव्य करून अशा लोकांच्या मानसिक समुपदेशनासाठी एनजीओना सरकारतर्फे अनुदान देण्यात येईल, अशी घोषणाही सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधानसभेत केली.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी गे लोकांमुळे एचआयव्हीचा प्रसार होतो व त्यांना सायकॉलॉजीकल उपचाराची गरज आहे, असे विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे डॉ. सावंत यांच्या विधानाचेही पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून एचआयव्हीबाधित रक्त ओळखणे सोपे झाले असले तरी गेल्या ५ वर्षांत राज्यात अनेकांना रक्तातून एचआयव्हीची बाधा झाली, याकडे जितेंद्र आव्हाड आणि अन्य सदस्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे शासनाचे लक्ष वेधले. नॅक या चाचणीसाठी केंद्र सरकारकडून निधी येणार आहे, पण हा निधी उपलब्ध होईपर्यंत राज्य सरकार यासाठी निधी देणार काय, न्युक्लीयर अ‍ॅसिड टेस्टिंग (नॅट) सर्व रक्तपेढ्यांना सक्तीचे करणार का, तसेच एचआयव्हीबाधितांसाठी ड्रॉपिन सेंटर आणि एलजीबीटी कम्युनिटीमध्येसुद्धा एचआयव्हीबाबत भीतीचे वातावरण आहे, त्यांच्यासाठी समुपदेशन करण्याची आवश्यकता असून, त्यासाठी काम करणाऱ्या एनजीओना सरकार अनुदान देणार आहे का, असे उपप्रश्न भाजपाचे आशिष शेलार यांनी विचारले. त्यावर सावंत म्हणाले, नॅक टेस्टसाठी लागणारे तंत्रज्ञान दोनच कंपन्यांकडे उपलब्ध असून, ते केंद्र सरकारच्या योजनेतून देशभरातील सर्वच रक्तपेढ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या योजनेत आपल्या राज्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून, लवकरच याकरिता निधी उपलब्ध होईल. एचआयव्हीबाधित रुग्णांसाठी ड्रॉपिन सेंटर सुरू करण्यात आले असून, मुंबईत १२ तर राज्यात ७० ड्रॉपिन सेंटर कार्यान्वित आहेत.

हजार माणसांमागे
४ एचआयव्ही ग्रस्त

सध्या नॅटची सोय मुंबईत ३, नागपुरात २ आणि पुणे-औरंगाबादेत प्रत्येकी एका ठिकाणी आहे. राज्यात २०१० साली दर हजारी माणसांमागे ४ एचआयव्हीग्रस्त होते हे प्रमाण आता दर हजारामागे ३ झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: HIV spread due to gay people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.