वीज मंडळाच्या अभियंत्याला मारहाण
By Admin | Updated: March 9, 2015 22:40 IST2015-03-09T22:40:41+5:302015-03-09T22:40:41+5:30
रोहा तालुक्यातील खारपाटी येथे थकीत वीज बिलाची वसुली करणे व विद्युत पुरवठा खंडित करणे या शासकीय कामकाजासाठी गेले असताना वीज

वीज मंडळाच्या अभियंत्याला मारहाण
रोहा : रोहा तालुक्यातील खारपाटी येथे थकीत वीज बिलाची वसुली करणे व विद्युत पुरवठा खंडित करणे या शासकीय कामकाजासाठी गेले असताना वीज मंडळाचे कनिष्ठ अभियंता रमेश वायकर यांच्यावर एकाने लाकडी फाट्याने हल्ला करत मारहाण व शिवीगाळ केली. याबाबत रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कनिष्ठ अभियंता रमेश वायकर आपले सहकारी परशुराम कदम व सुनील कड यांच्याबरोबर खारापटी येथे वीज बिलाच्या वसुलीकामी गेले असता दुपारी आरोपी ज्ञानेश्वर कारभारी याने लाइट बिलाची मागणी का करता, असे म्हणत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी फाट्याने डाव्या हाताच्या खांद्यावर मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा आणला. याबाबत रमेश वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(वार्ताहर)