गोरेगावात ‘हिट अ‍ॅण्ड रन’

By Admin | Updated: May 16, 2015 00:03 IST2015-05-16T00:03:06+5:302015-05-16T00:03:06+5:30

गोरेगाव पूर्वच्या वनराई पोलीस ठाण्याच्या समोर बुधवारी रात्री अनोळखी वाहनाने दिलेल्या धडकेत एक २२वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला

'Hit and Run' in Goregaon | गोरेगावात ‘हिट अ‍ॅण्ड रन’

गोरेगावात ‘हिट अ‍ॅण्ड रन’

मुंबई : गोरेगाव पूर्वच्या वनराई पोलीस ठाण्याच्या समोर बुधवारी रात्री अनोळखी वाहनाने दिलेल्या धडकेत एक २२वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही तरुणी टाटा कन्सल्टन्सीत (टीसीएस) कार्यरत होती. पोलीस ठाण्यासमोर अपघात घडला असला तरी वाहनचालकाबाबत वनराई पोलिसांना अद्याप सुगावा लागला नाही.
अर्चना पंड्या (२२) असे या मयत तरुणीचे नाव आहे. ती अंधेरीच्या वर्मा नगरमध्ये राहत होती. कामावरून घरी परतताना पश्चिम द्रुतगती महामार्ग ओलांडताना एका अनोळखी वाहनाने तिला धडक दिली. आरोपीने तिचा मृतदेह उचलून फुटपाथवर ठेवून पळ काढल्याचा पोलिसांना संशय आहे. बुधवारी मला वनराई पोलिसांकडून फोन आला, तेव्हा मी विक्रोळीला होतो. बहिणीचा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयात पोहोचलो, तेव्हा बहिणीचा मृत्यू झाला होता, अशी माहिती अर्चनाचा भाऊ सिद्धार्थने दिली. (प्रतिनिधी)

Web Title: 'Hit and Run' in Goregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.