ऐतिहासिक ठाणो स्थानक, मात्र गैरसोयींचे माहेरघर !
By Admin | Updated: August 16, 2014 22:57 IST2014-08-16T22:57:42+5:302014-08-16T22:57:42+5:30
16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ते ठाणो या मार्गावर भारतातील पहिली रेल्वे धावली. त्यास आता 161 वर्षे झाली तरीही ठाणो स्थानकाला अद्यापर्पयत जंक्शनचा दर्जा मिळालेला नाही.

ऐतिहासिक ठाणो स्थानक, मात्र गैरसोयींचे माहेरघर !
>अनिकेत घमंडी - ठाणो
16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ते ठाणो या मार्गावर भारतातील पहिली रेल्वे धावली. त्यास आता 161 वर्षे झाली तरीही ठाणो स्थानकाला अद्यापर्पयत जंक्शनचा दर्जा मिळालेला नाही. ज्या हिरिरीने निवडणुका लढवल्या जातात त्या जोमाने समस्या का सोडवल्या जात नाहीत, असा सवाल मतदारांना पडला आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी शिवसेनेचे तीन आमदार मात्र त्यांना रेल्वे समस्या सोडविण्यासह प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्याबाबत स्वारस्य वाटत नसल्याचे चित्र आहे.
सीएसटी स्थानकाचा विकास ज्या झपाटय़ाने झाला त्या तुलनेत ठाणो स्थानकाची विकासयात्र कूर्मगतीने सुरू असल्याने प्रवाशांना गर्दीतून घुसमटत प्रवास करावा लागत आहे. या ठिकाणी एकूण 11 फलाट असून त्यातून फलाट क्रमांक 1, 3/4, 5/6, 7 येथून उपनगरीय लोकलच्या अप/डाऊन मार्गावरील धिम्या/जलद फे:या होतात. फलाट 5 ते 7 मध्येच लांब पल्ल्याच्या दिवसाला 2क्क्हून अधिक गाडय़ा दोन्ही मार्गावर थांबतात. फलाट 9, 1क्, 1क्ए येथून केवळ ट्रान्स हार्बरमार्गे वाशी/नेरळ बेलापूर, पनवेलसाठीच्या लोकल धावतात. मध्य रेल्वेच्या एकूण 191क् फे:यांपैकी 15क्क् हून अधिक फे:या या स्थानकामधून होतात, त्यापैकी सुमारे दिडशे फे:या येथूनच सीएसटीसाठी दोन्ही मार्गावर सोडल्या जातात.
स्थानकाच्या पूर्व-पश्चिम अशा 25 तिकीट खिडक्या आणि सहा आरक्षण केंद्रातील खिडक्यांमधून होणा:या तिकीट वितरणाच्या माध्यमातून दिवसाला सुमारे 5क् लाखांची उलाढाल होणारे हे मध्य रेल्वेच्या 75 उपनगरीय स्थानकांमधील एकमेव स्थानक आहे. मात्र या ठिकाणी रेल्वेच्या निकषांनुसार सुमारे 4क् ते 45 तिकीट खिडक्या दोन सत्रंत सुरू असणो अत्यावश्यक आहे. येथे तीन पादचारी पूल असून त्यापैकी दोन 198क् च्या दशकातील असून त्यांची डागडुजी होणो आवश्यक आहे. तिस:या 12 मीटर लांबीच्या पादचारी पूल गेल्या वर्षीच बांधण्यात आला असला तरी तोही अपुरा आहे. कल्याण आणि मुंबई दिशेला 6 मीटर लांबीचे अन्य दोन पूल मंजूर झाले असले तरीही ते नेमके कधी पूर्ण होणार याबाबत अनिश्चितता आहे. दोन एस्कलेटर (स्वयंचलित जिन्यांची) सुविधा येथे देण्यात आली असली तरीही ती सर्व फलाटात नसल्याने प्रवाशांमध्ये दुजाभाव केल्याची भावना आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी केवळ तीन स्वच्छतागृहे असून ती फलाट 2 वर 2 आणि 1क् ए वर 1 असल्याने अन्य कोणत्याही फलाटावर ही सुविधा नाही. डिलक्स टॉयलेटच्या घोषणोसह जागा निश्चित होऊन दीड वर्ष उलटले तरीही ते अस्तित्वात आलेले नाही. फलाट 1क् वरच वातानुकूलित शयनगृह असले तरीही ते केवळ लांबपल्ल्याच्या आणि त्यातही केवळ ब्रेक जर्नी करणा:यांसाठी उपलब्ध आहे, त्याचे दरही सर्वसामान्याला न परवडणारे असल्याने प्रवासी फारसे त्या ठिकाणी फिरकत नाहीत. पाणपोयांचा अभाव, अरुंद फलाट अशा सर्व गैरसोयीत त्यांना प्रवास करावा लागत आहे.
राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या मेंटल हॉस्पिटलच्या अतिक्रमणातील काही जागेत नव्या स्थानकाचा प्रस्ताव आमदार एकनाथ शिंदेंनी मांडला होता, मात्र शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे तसेच संबंधितांच्या योग्य पाठपुराव्याअभावी तो धूळ खात पडल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामागून आलेल्या मोनो-मेट्रोबाबत जेवढा उतावळेपणा लोकप्रतिनिधी दाखवत आहेत तेवढी आक्रमकता ऐतिहासिक ठाणो स्थानकाच्या बाबतीत का दाखवत नाहीत, असा सवाल प्रवाशांमध्ये खदखदत आहे.
च्उपनगरीय लोकलच्या प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी कल्याण-वाशी व्हाया ऐरोली हा प्रस्ताव कागदावर मंजूर झाला असला तरीही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाल्यास सुमारे दीड लाख प्रवासी ठाणो स्थानकात येत ट्रान्सहार्बरला जाण्याचा द्रविडीप्राणायाम करणार नाहीत. यामध्ये त्यांचा 4क् मिनिटांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील.
च्तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ांना वेगळे स्थानक मिळाल्यास या स्थानकात नुकत्याच झालेल्या रिमॉडेलिंगच्या सुविधेमुळे ठाणो-कर्जत/कसारा मार्गावर लोकल सोडण्यात येतील. त्यामुळे उपनगरीय गाडय़ांमधील गर्दीही कमी होऊन प्रवाशांना सुखद-सुरक्षित प्रवासाची मुभा मिळेल.
टर्मिनलची गरज : मध्य रेल्वेच्या एकूण 42 लाख प्रवाशांपैकी 21 लाख प्रवासी हे ठाणो जिल्ह्यातून प्रवास करतात. त्यामध्ये लांब पल्ल्याच्या प्रवाशांचाही समावेश आहे. त्या प्रवाशांना कल्याण व ठाणो येथून अवघ्या दोन - तीन मिनिटांत गाडी पकडण्याची कसरत करावी लागते. त्या गडबडीत अपघातही होतात, त्याऐवजी एखादे नवे स्थानक बांधून त्यास टर्मिनलचा दर्जा देऊन तेथे लांब पल्ल्याच्या गाडय़ा थांबवाव्यात आणि सोडाव्यात. जेणोकरून या फलाटाची गर्दी विभागली जाईल.
सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी असूनही वानवा : शिवसेनेचा गड, त्यांचे तीन आमदार, एक खासदार, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, आरोग्यमंत्री जितेंद्र आव्हाड आदी मातब्बर लोकप्रतिनिधी ठाण्याचे असूनही या ठिकाणच्या रेल्वे स्थानकाची अवस्था केविलवाणी का, असा सवाल प्रवाशांमध्ये आहे. या सर्वानी एकत्र येऊन स्थानकाच्या विकासाबाबत पुढाकार घेणो अत्यावश्यक असल्याची भावना ठाणोकरांमध्ये आहे.