हिरे व्यापा:यांना फसवणारा अटकेत

By Admin | Updated: October 4, 2014 02:37 IST2014-10-04T02:37:35+5:302014-10-04T02:37:35+5:30

हिरे व्यापारी असल्याची बतावणी करून व्यापा:यांना कोटींचा गंडा घालणा:या महाठगाला गुन्हे शाखेने बेडय़ा ठोकल्या आहेत.

Hire Vyappa: The deceiver is arrested | हिरे व्यापा:यांना फसवणारा अटकेत

हिरे व्यापा:यांना फसवणारा अटकेत

>मुंबई : हिरे व्यापारी असल्याची बतावणी करून व्यापा:यांना कोटींचा गंडा घालणा:या महाठगाला गुन्हे शाखेने बेडय़ा ठोकल्या आहेत. धीरूभाई मुंजीभाई पटेल (52) असे आरोपीचे नाव असून, घाटकोपरमध्ये एका व्यापा:याला 9क् लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. पटेलविरोधात मुंबईसह ठाणो, गुजरात, जयपूर अशा ठिकाणी हिरे व्यापा:यांना फसविल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. 
पटेल हा मूळचा सुरत येथे राहणारा असून, मुंबईसह ठाण्यातील हिरे व्यापा:यांना त्यांनी नाकीनऊ आणले होते. घाटकोपर पूर्वेकडील महात्मा गांधी रोडवर हिरे व्यापारी वसंत दोषी (62) यांचे भारती ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान असून, त्यांच्यासोबत मौलिक नावाचा 33 वर्षीय तरुण काम करीत होता. 21 सप्टेंबर रोजी पटेलसहित तिघांनी मौलिकला गाठून आपण हिरे व्यापारी असल्याची बतावणी करून 9क् लाखांचे हिरे विकत घ्यायचे असल्याचे सांगितले. 23 सप्टेंबर रोजी हिरे तपासण्याच्या बहाण्याने पटेलसहित तिघा लुटारूंनी हातसफाईने दोषी यांच्या दुकानातील ख:या हि:यांनी भरलेले पाकीट लंपास करून खोटय़ा हि:यांनी भरलेले पाकीट हातात देऊन पळ काढला. बदललेले पाकीट आणि पाकिटात असलेले हिरे खोटे असल्याचे समजताच या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
या प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण कक्ष 7चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सुर्वे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल ढोलेंसह त्यांच्या तपास पथकांनी दुकानातील सीसीटीव्हीच्या अस्पष्ट छायाचित्रणाच्या आधारे मुंबईतील कानाकोपरा शोधला. मात्र हाती काहीही न लागल्याने गुन्हे शाखेने त्यांचा मोर्चा गुजरात राज्यातील हिरे बाजारात वळविला. सुरत, वडोदरा, अहमदाबाद, अमरेली, भावनगर, राजकोट येथे या त्रिकुटाचा शोध घेत असताना अहमदाबादमध्ये पटेल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अहमदाबाद येथे दबा धरून बसलेल्या पोलिसांनी 2 ऑक्टोबर रोजी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पटेलकडून 2क् लाख रुपये किमतीचे हिरे गुन्हे शाखेने हस्तगत केले असून, या गुन्ह्यात त्याच्यासोबत सहभागी असलेल्या इतर दोघांचाही गुन्हे शाखा शोध घेत आहे. (प्रतिनिधी)
 
च्पटेल हा लंगडा या नावाने गुन्हेगारी जगतात ओळखला जातो. हाच यामागील मुख्य सूत्रधार आहे. त्याच्या विरोधात डी. बी. मार्ग पोलीस ठाणो, व्ही. पी. रोड, गावदेवी, बोरीवली, एमआयडीसी, मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात हिरे व्यापा:यांना फसविल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
 
च्डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात एका हिरे व्यापा:याला 3 कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी त्याने शिक्षाही भोगली आहे. तसेच गुजरातमधील सुरत, वडोदरा, जयपूरसह राजस्थानमधील पोलीस ठाण्यांत त्याच्या विरोधात असेच फसविल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास करीत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Web Title: Hire Vyappa: The deceiver is arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.