महापालिकेकडून जुने मुख्यालय भाडय़ाने

By Admin | Updated: November 9, 2014 00:31 IST2014-11-09T00:31:42+5:302014-11-09T00:31:42+5:30

नव्या इमारतीत सर्वच कारभार हलवण्यात आल्यानंतर सिबीडीमधील जुन्या मुख्यालयातील दोन मजले भाडय़ाने देण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

Hire old headquarters from Municipal Corporation | महापालिकेकडून जुने मुख्यालय भाडय़ाने

महापालिकेकडून जुने मुख्यालय भाडय़ाने

नवी मुंबई : नव्या इमारतीत सर्वच कारभार हलवण्यात आल्यानंतर सिबीडीमधील जुन्या मुख्यालयातील दोन मजले भाडय़ाने देण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याविषयी निविदा मागविण्यात आल्या असून यातून भाडय़ापोटी महिन्याला किमान 1क् लाख रूपये उत्पन्न मिळणार आहे. 
पालिकेच्या मालकीच्या शहरात अनेक वास्तू आहेत. पालिकेच्या विविध विभागाची कार्यालये, शाळा, रूग्णालये, समाजमंदिरे व इतरांचा समावेश आहे. अपंग व इतरांना स्टॉल्सचे वितरणही करण्यात आले आहे. परंतु तीन वर्षार्पयत मालमत्ता विभागाकडे कधीही गांभीर्याने लक्ष देण्यात आले नव्हते. यामुळे अनेक वास्तू धुळखात  होत्या. काही समाजमंदिर व इतर ठिकाणच्या भाडेकरूंचा करार संपुष्टात आला होता. अनेकांची भाडी थकली. परंतु कधीही याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही. यामुळे महापालिकेस स्वत:च्या वास्तुंपासून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते.
महापालिकेने स्वत:च्या मालमत्तांचे सव्रेक्षण केले असून त्या भाडय़ाने देणो व जुन्या भाडेकरूंकडून थकबाकी वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यापुढे निविदा काढून इमारती रितसर भाडय़ाने दिल्या जाणार आहेत. याचाच भाग म्हणून सिबीडीमधील जुन्या मुख्यालयामधील 7 व 8 वा मजला भाडय़ाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी निवीदा मागविण्यात आल्या आहेत. दोन्ही मजल्यावर प्रत्येकी 1क्45 चौरस मिटर क्षेत्रफळ आहे. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 5 लाख 14 हजार 533 किमान भाडे अपेक्षित आहे. इच्छुकांनी 1 डिसेंबर्पयत निविदा सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 

 

Web Title: Hire old headquarters from Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.