कंत्राटी, हंगामी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:11 IST2021-01-13T04:11:53+5:302021-01-13T04:11:53+5:30
कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक उपोषण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कंत्राटी कोरोना योद्धे अहोरात्र कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. भविष्यकालीन दीर्घ ...

कंत्राटी, हंगामी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्या
कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कंत्राटी कोरोना योद्धे अहोरात्र कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. भविष्यकालीन दीर्घ लढ्याचा विचार करता कोविड काळात काम करणाऱ्या कंत्राटी, हंगामी कामगारांना कायमस्वरूपी शासकीय नोकरीत सामावून घ्या, अशी मागणी कोरोना योध्दा कर्मचारी परिषदेने केली आहे. यासाठी संघटनेचेच्या वतीने सोमवारी आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
याबाबत संघटनेचे प्रमोद काटे म्हणाले की, सर्व कोरोना योद्धे कुटुंबीयांना सोडून रुग्णाची सेवा करण्यासाठी काम करीत आहेत. पण विलगीकरण कक्षातील कंत्राटी कामगारांना सेवेतून काढण्याचे नियोजन शासन करत आहे. यामुळे या सर्वांना बेरोजगार होऊन उपासमारीची वेळ आलेली आहे. ज्या कंत्राटी कामगारांना कमी केले, त्यांना आपण पुन्हा नोकरीत सामावून घ्यावे. तसेच त्यांना आरोग्य विमा, जोखम भत्ता द्यावा. तसेच ज्यांचा कामावर असताना कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत करून कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून द्यावे, अशी आमची मागणी आहे.