दोन दिवसांत अपहरणाचा छडा
By Admin | Updated: September 5, 2014 02:44 IST2014-09-05T02:44:15+5:302014-09-05T02:44:15+5:30
कुठल्याही धागेदो:यांशिवाय एखाद्या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावणो ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे.

दोन दिवसांत अपहरणाचा छडा
मुंबई : कुठल्याही धागेदो:यांशिवाय एखाद्या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावणो ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. अशाच प्रकारे एका अपहरण प्रकरणाचा सीएसटी रेल्वे पोलिसांनी दोन दिवसांत छडा लावला आणि यातील आरोपीला पकडण्यातही यश मिळविले. तर या प्रकरणातील अपहरण झालेली मुलगी रेल्वे पोलिसांना मुंब्य्रात सापडली.
सीएसटी रेल्वे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रवींद्र दळवी यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये राहणारी लखी डे ही आपल्या दोन लहान मुलांसह लखनौला जात होती. त्या वेळी तिच्या गावातच राहणारा आणि बेरोजगार असणारा फिरोज (25) उर्फ नसीम मिया हा तुला लखनौला मी सोडतो असे सांगून हावडा ट्रेनमधून थेट मुंबईला घेऊन आला. 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास सीएसटी स्थानकात दोघेही उतरल्यानंतर लखी आणि फिरोजमध्ये मुंबईला येण्यावरून वाद झाला. त्याचवेळी लखीसोबत असलेल्या दोन मुलांपैकी तीनवर्षीय मुलगी किरणला माङयाजवळ दे असे सांगितले आणि तो निघून गेला. आपल्यासोबत असलेला फिरोज मुलीला घेऊन गेल्याचे लक्षात येताच घाबरलेली लखी पश्चिम बंगालमध्ये गेली आणि तिने सगळी हकिकत आपल्या नव:याला सांगितली. याबाबत तेथील रेल्वे पोलिसांना ही माहिती सांगितल्यावर गुन्हा मुंबई रेल्वे पोलिसांकडे येत असल्याचे सांगण्यात आले. अखेर 1 सप्टेंबर रोजी सीएसटी रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मुलगी किरण हिचा शोध घेणो आवश्यक असल्याने त्या दृष्टीने पाऊल टाकण्यास रेल्वे पोलिसांनी सुरुवात केली. मात्र अपहरण करणारा फिरोज नेमका कुठे गेला असेल आणि त्याच्या हालचाली काय याची माहिती पोलिसांना मिळत नसल्याने एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन अंमलदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवण्यात आले. तेथे आरोपीची माहिती मिळाल्यावर फिरोज याला 3 सप्टेंबर रोजी पकडले होते आणि त्याच्याकडून किरणबाबत माहिती घेण्यात आली. तेव्हा किरणला मुंब्य्रात सोडून देण्यात आल्याचे त्याने सांगितले. किरणचा शोध घेण्यात आल्यानंतर मुंब्रा-बायपास रोडवर ती सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी त्वरित या महिलेशी संपर्क साधला. (प्रतिनिधी)
च्आरोपीला कोलकोता येथील न्यायालयात पश्चिम बंगाल आणि मुंबई पोलिसांच्या साहाय्याने उभे केले असता त्याला जामीन मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत सीएसटी रेल्वे पोलिसांतही गुन्हा दाखल झाला असून, चौकशीसाठी आरोपीला सीएसटी रेल्वे पोलिसांकडे यावे लागणार असल्याचेही सांगण्यात आले.