बचावासाठी अपहृत विद्यार्थिनीने मारली चालत्या रिक्षातून उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 06:01 IST2017-08-17T06:00:59+5:302017-08-17T06:01:02+5:30

‘शाळेच्या शौचालयातून बाहेर पडत असताना, तिघांनी तोंडाला रूमाल बांधून रिक्षात कोंबले.

A hijacked student killed her for a rescue | बचावासाठी अपहृत विद्यार्थिनीने मारली चालत्या रिक्षातून उडी

बचावासाठी अपहृत विद्यार्थिनीने मारली चालत्या रिक्षातून उडी

मुंबई : ‘शाळेच्या शौचालयातून बाहेर पडत असताना, तिघांनी तोंडाला रूमाल बांधून रिक्षात कोंबले. रिक्षातून पळवून नेत असताना सातवीच्या विद्यार्थिनीने चालत्या रिक्षातून उडी मारली आणि अपहरणाचा डाव फसल्याची घटना घाटकोपरमध्ये घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करत घाटकोपर पोलीस अधिक तपास करत आहेत.
घाटकोपर परिसरातील भट्टीपाडा येथील शाळेत १४ वर्षांची नेहा (नावात बदल) सातवीत शिकते. सोमवारी दुपारी ३च्या सुमारास ही घटना घडली. ती शाळेच्या शौचालयातून बाहेर पडत असताना तोंडाला रूमाल बांधून आलेल्या तिघांनी तिचे अपहरण करत रिक्षात कोंबले. रिक्षा असल्फा मेट्रो स्टेशन परिसरालगत येताच तिने संधी साधून रिक्षातून उडी मारल्याचे विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितले. दुपारी घडलेल्या घटनेनंतर विद्यार्थिनीने जवळच्या नातेवाइकांकडे गेली. त्यानंतर आईला याबाबत माहिती मिळताच तिने घाटकोपर पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येत असल्याचे घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यकंट पाटील यांनी दिली.

Web Title: A hijacked student killed her for a rescue