अपहृत झालेल्या व्यापा:याची हत्या

By Admin | Updated: November 15, 2014 01:56 IST2014-11-15T01:56:54+5:302014-11-15T01:56:54+5:30

सायनमधून अपहृत झालेल्या 65वर्षीय व्यापा:याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Hijacked business: The murder | अपहृत झालेल्या व्यापा:याची हत्या

अपहृत झालेल्या व्यापा:याची हत्या

मुंबई : सायनमधून अपहृत झालेल्या 65वर्षीय व्यापा:याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुन्हे शाखेने अटक केलेल्या तीन अपहरणकत्र्यानी व्यापा:याच्या 
हत्येची कबुली दिली. त्यानुसार गुन्हे शाखेची पथके मृतदेहाच्या शोधार्थ माळशेज घाटात रवाना झाली. या पथकांच्या हाती मृतदेहाचे अवशेष लागले आहेत.
मूळचे राजस्थानी असलेले हे व्यापारी गेल्या काही वर्षापासून मुंबईत वास्तव्यास होते. त्यांचा भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. अपहरणकत्र्यापैकी एकाला या व्यावसायिकाची इत्थंभूत माहिती होती. त्यानेच अन्य साथीदार गोळा करून या व्यापा:याच्या अपहरणाचा कट आखला. 
ठरल्याप्रमाणो 3 जून रोजी या व्यापा:याचे अपहरण करण्यात आले. दोन दिवसांनी अपहरणकत्र्यानी राजस्थानच्या जोधपूर शहरात वास्तव्यास असलेल्या व्यावसायिकाच्या पत्नीला सुमारे 3क् लाखांच्या खंडणीसाठी फोन 
केला. सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीने जोधपूर 
पोलीस ठाण्यात पतीचे अपहरण व खंडणीची तक्रार दिली. तेव्हापासून जोधपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत होते. त्यानंतर दोनेक आठवडय़ांपूर्वी हे प्रकरण मुंबई पोलिसांकडे तपासासाठी आले. त्यानुसार सायन पोलीस ठाण्यात अपहरण व खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
दरम्यान, या गुन्ह्याचा समांतर तपास करणा:या गुन्हे शाखेच्या युनिट 4ने तांत्रिक तपासावरून वांगणी परिसरातून विशाल दुगडे, अबीद महाबले आणि मिथुन पिल्ले या तिघांना गजाआड केले. त्यांचा चौथा साथीदार अद्याप फरार असून, पोलीस पथके त्याच्या मागावर असल्याचे समजते. अटकेतल्या तिघांनी व्यावसायिकाच्या हत्येची कबुली दिल्याचे समजते. 
मृतदेहाची विल्हेवाट माळशेज घाटात लावल्याची माहितीही 
या तिघांनी दिली. त्यानुसार युनिट 
4चे पथक माळशेज घाटात 
थडकले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने या पथकाने घाटात शोधाशोध केली तेव्हा त्यांना मृतदेहाचे अवशेष सापडले. (प्रतिनिधी)
 
अपहरणकत्र्यापैकी एक आरोपी या व्यावसायिकाला ओळखत होता. त्याला या व्यावसायिकाची इत्थंभूत माहिती होती. त्यानेच व्यावसायिकाच्या अपहरणाचा व कुटुंबीयांकडून खंडणी मागण्याचा कट आखला. अपहरण केल्यानंतर पत्नीकडे खंडणीची मागणी करण्यात आली. मात्र व्यावसायिकाच्या कुटुंबाने खंडणी देण्यास नकार दिल्याने हत्या करण्यात आली. 

 

Web Title: Hijacked business: The murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.