महामार्गावर लुटणारे दोघे गजाआड
By Admin | Updated: December 25, 2014 22:16 IST2014-12-25T22:16:04+5:302014-12-25T22:16:04+5:30
जवळील जेएनपीटी रोड व परिसरातून जाणाऱ्या वाहनांवरील चालकांना लुटणाऱ्या दोघांना पनवेल शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले.

महामार्गावर लुटणारे दोघे गजाआड
पनवेल : जवळील जेएनपीटी रोड व परिसरातून जाणाऱ्या वाहनांवरील चालकांना लुटणाऱ्या दोघांना पनवेल शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले.
भास्कर सांगले हे त्यांच्या ताब्यातील कंटेनर घेऊन जेएनपीटी रोडवरुन पुणे बाजूकडे जात असताना टी पॉर्इंट रोडवर त्यांच्या वाहनासमोर आरोपी आनंद पाटील (२२) व त्यांचा अल्पवयीन सहकारी या दोघांनी संगनमत करुन दुचाकी कंटेनरच्या पुढे लावली व त्याला थांबवून लोखंडी टॉमी व लोखंडी पान्ह्याचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण करुन, त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाइल फोन असा २२०० रुपये किमतीचा माल काढून घेऊन ते पसार झाले
होते.
याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जेएनपीटी ते पनवेल महामार्गावर सापळा रचून या दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे व त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. (वार्ताहर)