महामार्ग पोलिसांकडून लाखोची दंडवसुली
By Admin | Updated: January 5, 2015 01:20 IST2015-01-05T01:20:08+5:302015-01-05T01:20:08+5:30
मुंबई-गोवा महामार्गावरील केंबुर्ली महामार्ग पथकाकडून २०१३-२०१४ मध्ये भरीव दंड वसुलीची कारवाई केली आहे

महामार्ग पोलिसांकडून लाखोची दंडवसुली
दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील केंबुर्ली महामार्ग पथकाकडून २०१३-२०१४ मध्ये भरीव दंड वसुलीची कारवाई केली आहे. वाहतूक शाखेचे अप्पर पोलीस महासंचालक सुरेंद्रकुमार पांडे, पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोलीस उपाधिक्षक सावंत, पोलीस निरीक्षक बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. महामार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये २०१३ मध्ये एकूण १० हजार ३६ प्रकरणात तडजोड शुल्क १० लाख ५६ हजार ९०० रुपये, २०१४ मध्ये एकूण ११ हजार ४६२ प्रकरणामध्ये तडजोड शुल्क ११ लाख ९० हजार रुपये इतकी दंड वसुली केली आहे. (वार्ताहर)