महामार्गावर बसला अपघात

By Admin | Updated: October 7, 2014 00:13 IST2014-10-07T00:13:04+5:302014-10-07T00:13:04+5:30

सायन-पनवेल महामार्गावर रात्री १२.४५ वा. मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या एसटी बस क्र. एमएच ०६ एस ८९४९ या बसच्या चालकाने जलद ब्रेक मारल्याने वाहनावरील ताबा सुटून अपघात झाला

Highway accident | महामार्गावर बसला अपघात

महामार्गावर बसला अपघात

तळोजा : सायन-पनवेल महामार्गावर रात्री १२.४५ वा. मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या एसटी बस क्र. एमएच ०६ एस ८९४९ या बसच्या चालकाने जलद ब्रेक मारल्याने वाहनावरील ताबा सुटून अपघात झाला. यात आठ जण जखमी झाले आहेत.
मुंबईहून बारामतीकडे निघालेली एसटी एशियाड बस सायन-पनवेल महामार्गावरून पनवेलच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना खांदा कॉलनी सिग्नल येथील रस्त्याच्या मधोमध लावलेल्या डिव्हायडर ड्रमचा अंदाज न आल्याने तात्काळ ब्रेक मारला व चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे उजव्या बाजूला असलेल्या महेंद्र शोरूमशेजारी ही बस पलटली. या अपघातात राहुल अंकुश राऊत (२५), अंबादास भगवान माळी (५०), सूरज चिखलेकर (१८), ठकूबाई कारांडे (६५), वैभव कुंभार (२०), जालिंदर तुरगुडे (४४), मीरा रणभिसे, सोमी रणभिसे हे जखमी असून जखमींना कामोठा एमजीएम येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटनेची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Web Title: Highway accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.