मुंबई, ठाण्यात स्वेटर्सची सर्वाधिक विक्री

By Admin | Updated: October 29, 2014 22:26 IST2014-10-29T22:26:14+5:302014-10-29T22:26:14+5:30

नेपाळ आणि उत्तर पूव्रेतील सीमेवरच्या राज्यातील सर्व स्वेटर्स आणि उबदार कपडे विकणा:या मंडळींची व्यवसायासाठीची पहिली धाव मुंबई, ठाण्यात असते.

The highest sale of sweaters in Mumbai, Thane | मुंबई, ठाण्यात स्वेटर्सची सर्वाधिक विक्री

मुंबई, ठाण्यात स्वेटर्सची सर्वाधिक विक्री

ठाणो : नेपाळ आणि उत्तर पूव्रेतील सीमेवरच्या राज्यातील सर्व स्वेटर्स आणि उबदार कपडे विकणा:या मंडळींची व्यवसायासाठीची पहिली धाव मुंबई, ठाण्यात असते. याचे कारण दरवर्षी त्यांच्याकडून विकल्या जाणा:या स्वेटर्स आणि उबदार कपडय़ांची सर्वाधिक विक्री ठाणो आणि मुंबईतच होते. याचे कारण म्हणजे ठाणो व मुंबईकरांची लाइफ स्टाइल हे आहे.
स्वेटर्स आणि उबदार कपडे हे मोठय़ांचे असोत की छोटय़ांचे, त्यांचा वापर फार तर दोन ते चार महिने असतो. त्यामुळे एकदा ते घेतले की, आता किमान पाच-दहा वर्षे पाहायला नको, अशा स्वरूपाचा विचार बहुधा सर्वसामान्य करतात. परंतु, तो विचार ठाणो, मुंबई, नवी मुंबई यांच्याबाबत उपयुक्त ठरत नाही. याचे कारण या तीनही महानगरांतील सर्वच नागरिकांची शरीराची मापे दरवर्षी बदलत असतात. जंकफूड खाणो, लाइफ स्टाइल एकसारखी नसणो, मधुमेह आणि अन्य विकार असणो तसेच डायटिंगचे फॅड यामुळे या तीनही महानगरांतील सर्वच नागरिक मग ते स्त्री, पुरुष असोत की बच्चेकंपनी अथवा ज्येष्ठ असोत, त्यांच्या शरीराची मापे दरवर्षी बदलत असतात आणि स्वेटर्स व उबदार कपडे हे तर शरीराला घट्ट बसणारे घेतले जातात. त्यामुळे शरीरात थोडा जरी बदल झाला तरी आदल्या वर्षी घेतलेले हे कपडे निरुपयोगी ठरतात. त्यामुळे या तीनही महानगरांत दरवर्षी या कपडय़ांची विक्री वाढत्या प्रमाणात होते, अशी माहिती जोकीम थापा यांनी दिली.
त्यांच्या धर्मपत्नीने सांगितले की, मुंबई, ठाणोकर आणि नवी मुंबईकर हे फॅशन आणि नवे ट्रेंड तसेच डिझायनिंग याला महत्त्व देणारे आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीचे स्वेटर्स आणि उबदार कपडे या वर्षी वापरण्यासारखे असले तरी जर ते नव्या फॅशनला, डिझायनिंगला आणि पॅटर्नला सूट होणारे नसतील तर ते बाजूला ठेवून नवे ट्रेंडी स्वेटर्स अथवा उबदार कपडे घेण्याची क्रेझ येथील सर्वच नागरिकांची आहे. त्यामुळे अन्य शहरांत दीर्घकाळ ठिय्या देऊन रुक्कू-टुक्कू धंदा करण्यापेक्षा मुंबईत कमी वेळ थांबून भरपूर धंदा करणो व आपल्या गावी काही काळ निवांतपणो घालविणो याला हे तिबेटी, नेपाळी व उत्तर पूव्रेकडील सीमावर्ती राज्यांतील मंडळी प्राधान्य देतात. 
अनेकदा एकच दुकान ते मूळ सुरू करणारा परिवार दुस:याच्या स्वाधीन करून पुरेशी कमाई झाली की, गावी निघून जातो. मग, त्याचे नातेवाईक अथवा ओळखीचे ते दुकान चालवतात, असेही येथे घडते. 
(विशेष प्रतिनिधी)

 

Web Title: The highest sale of sweaters in Mumbai, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.