Join us
Daily Top 2Weekly Top 5

High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:54 IST

High tide Alert for Mumbai: ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजून ३९ मिनिटांनी ५.०३ उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

मुंबई : ४ ते ७ डिसेंबरच्या दरम्यान समुद्राला मोठी भरती येणार आहे. या कालावधीत साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

या काळात नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यानजीक जाऊ नये, असे आवाहन महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने केले आहे.  ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजून ३९ मिनिटांनी ५.०३ उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे येणाऱ्या अनुयायांनी समुद्रकिनारी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : High Tide Alert: Mumbai Coast Braces for Giant Waves

Web Summary : Mumbai is on high alert for high tides from December 4-7. Waves exceeding 4.5 meters are expected, peaking on December 6th with 5.03-meter waves. Citizens are urged to avoid the shoreline, especially around Chaityabhoomi and Shivaji Park.
टॅग्स :हाय अलर्टमुंबईमुंबई महानगरपालिका