सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट
By Admin | Updated: March 24, 2015 01:25 IST2015-03-24T01:25:19+5:302015-03-24T01:25:19+5:30
राज्यातील सर्व वाहनांना येत्या १५ एप्रिलपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यात येतील, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.

सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट
मुंबई : राज्यातील सर्व वाहनांना येत्या १५ एप्रिलपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यात येतील, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. राज्य शासनाने न्यायालयात तसे प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले.
शोभाताई फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शाळेतील बस बोगस क्रमांकाने धावत असल्याबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना परिवहनमंत्री रावते म्हणाले की, न्यायालयात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचे आश्वासन दिले असल्याने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
राज्यातील शाळेच्या बसगाड्यांची संख्या २० हजार ७२७ आहे. त्यापैकी ७ हजार ९७० बसगाड्या या शाळेच्या मालकीच्या असून, १२ हजार ७३२ बसगाड्या खासगी मालकांच्या आहेत. शाळेच्या बसगाड्यांशी संबंधित गैरव्यवहाराच्या तक्रारींची जबाबदारी शाळेची की बसमालकांची हे निश्चित करण्याचा प्रयत्न आम्ही करीत असल्याचे रावते यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)