शहरात मतदानाचा उच्चंक
By Admin | Updated: October 17, 2014 01:06 IST2014-10-17T01:06:49+5:302014-10-17T01:06:49+5:30
मोदी लाटेमुळेच लोकसभा निवडणुकीत मुंबईत 5क् टक्क्यांवर मतदान झाले, हा राजकीय वतरुळातील दावा ठरत मुंबई शहरात विधानसभा निवडणुकीतही 5क् टक्क्यांचा आकडा ओलांडला आहे.

शहरात मतदानाचा उच्चंक
मुंबई : मोदी लाटेमुळेच लोकसभा निवडणुकीत मुंबईत 5क् टक्क्यांवर मतदान झाले, हा राजकीय वतरुळातील दावा ठरत मुंबई शहरात विधानसभा निवडणुकीतही 5क् टक्क्यांचा आकडा ओलांडला आहे. 2क्क्9 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत बुधवारी झालेल्या मतदानात 9 टक्क्यांनी तर उपनगर जिल्ह्यातील मतदानात 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईतील विधानसभा निवडणुकीतील हा मतदानाचा नवा उच्चंक आहे.
2क्क्9 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईला मतदानात 4क् टक्क्यांचा आकडाही पार करता आला नव्हता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी नावाच्या वादळाने मोठय़ा प्रमाणात मतदान झाल्याची चर्चा होती. लोकसभा निवडणुकीनंतर ही लाट ओसरल्याचे मानले जात होते. बुधवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानात मुंबईने 5क् टक्क्यांचा आकडा पार करत सरासरी 53 टक्के मतदानाची नोंद केली. त्यामुळे केवळ मोदी लाटेमुळेच मतदानाचा टक्का वाढला नसून त्यात प्रशासनाच्या प्रयत्नांचाही मोलाचा वाटा असल्याचे सांगण्यात येत आहे.
2क्क्9 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई शहरातील 1क् विधानसभा मतदारसंघांत सरासरी 44.15 टक्के इतके मतदान झाले होते. मात्र बुधवारच्या मतदानात त्यात सरासरी 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ ही वडाळा आणि भायखळा मतदारसंघात दिसून येते. 2क्क्9 साली वडाळ्यात 46.26, तर भायखळ्यात 39.क्5 टक्के मतदान झाले होते. त्यात सुमारे 15 टक्क्यांची वाढ होऊन यंदा वडाळ्यात 61.28 आणि भायखळ्यात 54.77 टक्के मतदान झाले. त्यात 6क् टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झालेला वडाळा हा एकमेव मतदारसंघ आहे.
शहरात एकूण 24 लाख 57 हजार 122 मतदारांनी नोंदणी केली होती. त्यात 13 लाख 59 हजार 1क्5 पुरुष, 1क् लाख 97 हजार 949 महिला आणि 68 इतर मतदारांचा समावेश होता. बुधवारी एकूण मतदारांपैकी 13 लाख 2 हजार 325 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 7 लाख 24 हजार 543 पुरुष, 5 लाख 77 हजार 745 महिला आणि 37 इतर मतदार आहेत.
उपनगर जिल्ह्यात 2क्क्9 च्या विधानसभेला 47.क्2 टक्के मतदान झाले होते; तर 2क्14 च्या विधानसभेला 5क्.56 एवढी मतदानाची टक्केवारी नोंदविण्यात आली आहे. उपनगरात एकूण 77 लाख 25 हजार 4क्6 मतदारांची नोंद झाली होती. यात पुरुष मतदार 54 लाख 72 हजार 717 एवढे होते. तर महिला मतदारांची संख्या 34 लाख 6क् हजार 731 एवढी होती.
15 ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानाचा विचार करता 77 लाख 25 हजार 4क्6 एवढय़ा मतदारांपैकी 38 लाख 93 हजार 433 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. 54 लाख 72 हजार 717 पुरुष मतदारांपैकी 21 लाख 82 हजार 75 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. तर 34 लाख 6क् हजार 731 महिला मतदारांपैकी 17 लाख 11 हजार 283 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. शिवाय उपनगरात 141 इतर मतदारांची नोंद झाली होती आणि त्यातील 83 इतर मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.
विधानसभानिहाय टक्केवारीचा विचार करता बोरीवली, कांदिवली, जोगेश्वरी, अंधेरी पूर्व, मुलुंड, भांडुप, घाटकोपर पूर्व आणि विलेपार्ले या मतदारसंघांनी मतदानाचा 5क् टक्क्यांचा आकडा गाठला आहे तर उर्वरित मतदारसंघांमध्ये सरासरी 45 टक्क्यांच्या आसपास मतदान झाल्याचे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
1येत्या 19 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी करण्यात येणार असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनासह मतमोजणीच्या साहित्याची ने-आण करताना काहीही अडथळा येऊ नये म्हणून वाहतुकीमध्ये काहीसे बदल करण्यात आले आहेत.कुलाबा येथे एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे मध्यवर्ती कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे.
2मतमोजणीच्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून फोर्ट येथील महापालिका मार्गाच्या दोन्ही बाजू मेट्रो जंक्शनपासून ते सीएसटी जंक्शनर्पयत, आपत्कालीन सेवेतील वाहने, स्थानिक रहिवाशांची वाहने व कर्तव्यावरील अधिकारी आणि कर्मचा:यांची वाहने वगळून इतर सर्व वाहनांच्या वाहतुकीकरिता बंद करण्यात येत आहेत. शिवाय या मार्गावर निवडणूक कर्तव्यावरील कर्मचा:यांची वाहने वगळता इतर सर्व वाहने उभी करण्यास मनाई केली आहे.
विधानसभामतदानाची
टक्केवारी
बोरीवली54.51
दहिसर5क्.47
मागाठाणो52.51
कांदीवली56.क्4
चारकोप51.74
मालाड (पश्चिम)5क्.क्5
जोगेश्वरी55.85
दिंडोशी53.57
गोरेगाव48.45
वर्सोवा38.89
अंधेरी पश्चिम46.37
अंधेरी पूर्व53.38
मुलूंड57.41
विक्रोळी51.56
भांडूप पश्चिम55.31
घाटकोपर (प.)52.65
घाटकोपर पूर्व56.24
मानखूर्द41.33
विलेपार्ले52.96
चांदिवली44.31
कुर्ला46.1
कलिना5क्.11
वांद्रे पूर्व47.2
वांद्रे पश्चिम51.21