दहिसर-मानखुर्द मेट्रोला हायकोर्टाचा ब्रेक

By Admin | Updated: November 29, 2014 02:12 IST2014-11-29T02:12:53+5:302014-11-29T02:12:53+5:30

दहिसर-मानखुर्द या महत्त्वाकांक्षी मेट्रो-2च्या प्रकल्पाला सुरू होण्याआधीच उच्च न्यायालयाने शुक्रवारी ब्रेक लावला़

High Court Break in Dahisar-Mankhurd Metro | दहिसर-मानखुर्द मेट्रोला हायकोर्टाचा ब्रेक

दहिसर-मानखुर्द मेट्रोला हायकोर्टाचा ब्रेक

मुंबई : दहिसर-मानखुर्द या महत्त्वाकांक्षी मेट्रो-2च्या प्रकल्पाला सुरू होण्याआधीच उच्च न्यायालयाने शुक्रवारी ब्रेक लावला़ या प्रकल्पासाठी गोरेगाव येथील आरे कॉलनीत कारशेड व रस्ता रुंदीकरणाचे काम होणार आह़े यासाठी येथील झाडांवर कु:हाड पडणार आह़े 
याविरोधात दाखल झालेल्या वनशक्ती या सामाजिक संघटनेने केलेल्या जनहित याचिकेची दखल घेत मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठाने तूर्तास तरी येथील झाडे न तोडण्याचे व तेथे कोणतेही पुनर्विकासाचे काम न करण्याचे आदेश एमएमआरडीए व महापालिकेला दिले आहेत़ यावरील पुढील सुनावणी येत्या गुरुवारी होणार आह़े
 
च्आरे कॉलनीचा काही भाग हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत मोडतो़
च्झाडे तोडणो म्हणजे पर्यावरण व झाडे संरक्षण-संवर्धन कायद्याचा भंग आह़े 
च्झाडे तोडण्यास मनाई करावी, झाडांच्या संरक्षणार्थ समिती नेमावी.

 

Web Title: High Court Break in Dahisar-Mankhurd Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.