फेरीवाल्यांच्या दादागिरीमुळे नागरिक हैराण

By Admin | Updated: January 18, 2015 23:30 IST2015-01-18T23:30:35+5:302015-01-18T23:30:35+5:30

डवलेनगर, सावरकरनगर, म्हाडा वसाहतीत राहणार्या जवळपास ३५ हजार नागरिकांचा प्रभाग १३ बनला आहे. प्रभागात ४५ इमारती,१२५ चाळीतून रिहवाशी

Hieroglyphs of hawkers falsely | फेरीवाल्यांच्या दादागिरीमुळे नागरिक हैराण

फेरीवाल्यांच्या दादागिरीमुळे नागरिक हैराण

नामदेव पाषाणकर, घोडबंदर
डवलेनगर, सावरकरनगर, म्हाडा वसाहतीत राहणार्या जवळपास ३५ हजार नागरिकांचा प्रभाग १३ बनला आहे. प्रभागात ४५ इमारती,१२५ चाळीतून रिहवाशी आपला उदार निर्वाह करीत आहेत. या प्रभागात पाण्याची टाकी असली तरी नागरिकांना पाण्यासाठी दिवस रात्र ताटकळत राहावे लागत आहे. बाहेरून येणारे फेरीवाले दादागिरी करून रस्ता अडवून बसतात त्याकडे पालिकेचे लक्ष नाही. येथे भरणारा मंगळवारचा आठवडे बाजार वाहतुकीला अडथळा ठरत असून या बाजारात महिलांचे दागिने लुटण्याचे प्रकार घडत असताना पोलीस व ठाणे महापालिका येथील फेरीवांल्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
येथे असलेल्या पालिकेच्या शाळा क्रमांक १२० मध्ये हनुमान नगर, साठे नगर, इंदिरा नगर, सावरकर नगर परिसरातून गोरगरीब घरातील मुले शिक्षणासाठी येत असतात. रस्ता क्रमांक २२ पूर्णपणे फेरीवाले वा भंगारवाले यांनी दुतर्फा अडवल्यामुळे या मुलांना वा त्यांच्या पालकांना काहीवेळा अपघातांना तोंड द्यावे लागते, तसेच शाळेजवळ रोड रोमियोंचा जमावडा रोज मुली आणि महिलांची छेडछाड करीत असताना त्याकडे कोणाचेही लक्ष नसते. प्रभागात म्हाडाच्या जागेवर टीएमटी कर्मचारी आणि पोस्ट खात्याचे आरक्षण आहे. त्यांचा विकास करण्यास विलंब लागत असल्यामुळे या जागेचा अनधिकृत वापर सुरु आहे. पालिका शाळेच्या ठराविक अंतरावर खासगी शाळेला न हरकत दिली जात असताना त्या नियमांचे उल्लंघन शिक्षण मंडळाकडून झाल्याचे दिसत असल्यामुळेच तीन खासगी शाळा येथे भरत आहेत.आरोग्य केंद्रात दौक्क्तर वेळेत येत नाहीत. कर्मचारी दिले जात नाहीत या तक्र ारीकडे आरोग्य विभागाचे लक्ष नाही.याचा नागरिकांमध्ये रोष आहे.

Web Title: Hieroglyphs of hawkers falsely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.