विद्यापीठाच्या मुख्य गेटजवळील अतिक्रमण हटेना

By Admin | Updated: November 16, 2014 01:07 IST2014-11-16T01:07:25+5:302014-11-16T01:07:25+5:30

मुंबई विद्यापीठाने कलिना कॅम्पसमधील मुख्य प्रवेशद्वाराजवळील जागा रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेला दिली होती.

Hetena encroached near the main gate of the university | विद्यापीठाच्या मुख्य गेटजवळील अतिक्रमण हटेना

विद्यापीठाच्या मुख्य गेटजवळील अतिक्रमण हटेना

मुंबई : मुंबई विद्यापीठाने कलिना कॅम्पसमधील मुख्य प्रवेशद्वाराजवळील जागा रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेला दिली होती. मात्र महापालिकेने रस्ता रुंदीकरणाकडे दुर्लक्ष करीत ही जागा काही दुकानदारांच्या घशात घातल्याने या मार्गावर वाहतूककोंडी होऊ लागली आहे. यामुळे विद्यापीठात येणा:या विद्याथ्र्याच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. 
विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील मुख्य प्रवेशद्वाराजवळील जागा विद्यापीठाने महापालिकेला रस्ता रुंदीकरणासाठी दिली आहे. महापालिकेने सुमारे 14 वर्षापूर्वी या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात काही दुकानदारांना गाळे दिले आहेत. या गाळ्यांमुळे विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार झोपडय़ांनी व्यापले असल्याने विद्यापीठाच्या उज्‍जवल प्रतिष्ठेला बाधा पोहोचत आहे.  
महापालिकेच्या विकास आराखडय़ानुसार कलिनाहून कुल्र्याकडे जाणा:या विद्यापीठासमोरील मार्गाचे रुंदीकरण करणार होते. यासाठी महापालिकेने विद्यापीठाकडून जागा घेतली. मात्र या जागेवर 2000 मध्ये तात्पुरत्या स्वरूपात काही दुकानदारांना जागा दिली. यामुळे विद्यापीठाच्या गेटवरच अस्वच्छता पसरली आहे.  पालिकेकडून रस्ता रुंदीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यापीठाने लक्ष घालून विद्याथ्र्याना सुरक्षा मिळवून द्यावी, अशी मागणी  सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी केली आहे.
 
14 वर्षापासून दुर्लक्ष
4विद्यापीठात दररोज हजारो विद्यार्थी येत असतात. हा मार्ग अरुंद असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. महापालिकेने सुमारे 14 वर्षापासून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने विद्यापीठात येणा:या विद्याथ्र्याच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

 

Web Title: Hetena encroached near the main gate of the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.