पोटगी देण्याचा हेमंत भोसलेंना कोर्टाचा आदेश

By Admin | Updated: July 10, 2014 02:49 IST2014-07-10T02:49:27+5:302014-07-10T02:49:27+5:30

गायिका आशा भोसले यांचा एनआरआय मुलगा हेमंत यांनी विभक्त झालेल्या पत्नीला दरमहा 4क् हजार रुपये देखभाल खर्च द्यावा, असे आदेश कुटुंब न्यायालयाने दिले आहेत़

Hemant Bhosale's court order to give bail | पोटगी देण्याचा हेमंत भोसलेंना कोर्टाचा आदेश

पोटगी देण्याचा हेमंत भोसलेंना कोर्टाचा आदेश

मुंबई : गायिका आशा भोसले यांचा एनआरआय मुलगा हेमंत यांनी विभक्त झालेल्या पत्नीला दरमहा 4क् हजार रुपये देखभाल खर्च द्यावा, असे आदेश कुटुंब न्यायालयाने दिले आहेत़ यासाठी हेमंत यांच्या 62 वर्षीय पत्नी यांनी 2क्12 मध्ये न्यायालयात अर्ज केला होता़ 
2क्क्2-क्3 मध्ये हेमंत यांनी घराबाहेर काढले व ते दुस:या महिलेसोबत राहू लागल़े एअर होस्टेस म्हणून दिवसरात्र काम करून हेमंत यांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या, पण आता मला केवळ आठशे रुपये पेन्शन आह़े त्यामुळे हेमंत यांनी देखभाल खर्च द्यावा़ कारण त्यांची यूके व भारतात खूप मालमत्ता आहे, असा दावा करण्यात आला होता़ याला हेमंत यांनी विरोध केला़ माङया पत्नीने आठशे रुपये पेन्शनचा दावा केला असली तरी तिची खरेदी हजारोंची असत़े  तेव्हा ती देखभाल खर्चाची मागणी करू शकत नाही, असा युक्तिवाद करण्यात आला़ त्यावर उभयतांचा मालमत्तेचा दावा ग्राह्य धरता येणार नाही़, असे न्यायालयाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)
 
हेमंत यांचा जन्म भोसले घराण्यात झाला असून, या प्रसिद्ध कुटुंबाचा दर्जा व सध्या स्कॉटलंडमध्ये वास्तव्य करीत असलेल्या हेमंत यांचे जीवनमान बघता त्यांनी पत्नीला दरमहा 4क् हजार रुपये देणो योग्यच आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आह़े 

 

Web Title: Hemant Bhosale's court order to give bail