हेमा उपाध्याय हत्या प्रकरण; जन्म ठेपेच्या शिक्षेविरोधात चिंतन उपाध्यायची हायकोर्टात धाव

By रतींद्र नाईक | Updated: October 24, 2023 22:07 IST2023-10-24T22:06:57+5:302023-10-24T22:07:05+5:30

चिंतन उपाध्याय याने या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले असून जामीनासाठी देखील अर्ज केला आहे.

Hema Upadhyay murder case; Chintan Upadhyay moves to the High Court against the sentence of birth imprisonment | हेमा उपाध्याय हत्या प्रकरण; जन्म ठेपेच्या शिक्षेविरोधात चिंतन उपाध्यायची हायकोर्टात धाव

हेमा उपाध्याय हत्या प्रकरण; जन्म ठेपेच्या शिक्षेविरोधात चिंतन उपाध्यायची हायकोर्टात धाव

मुंबई : छायाचित्रकार-शिल्पकार हेमा उपाध्याय आणि वकील हरेश भंबानींच्या दुहेरी हत्येचा कट रचल्याबद्दल दोषी ठरलेला आरोपी चिंतन उपाध्याय व त्याच्या साथीदारांना दिंडोशी सत्र न्यायालयाने जन्म ठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर चिंतन उपाध्याय याने या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. चिंतन उपाध्याय याने या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले असून जामीनासाठी देखील अर्ज केला आहे.


चित्रकार, छायाचित्रकार आणि शिल्पकार म्हणून जगविख्यात असलेल्या हेमा उपाध्याय (४२) आणि त्यांचे वकील हरीश भांबानी (६५) यांचे मृतदेह कांदिवली येथील एका नाल्यात २०१५ साली आढळून आले. कचरा गोळा करणाऱ्या कामगाराला नाल्यात दोन खोक्यांमध्ये हे मृतदेह सापडले. पती चिंतन उपाध्याय यांनी मारेकऱ्यांना सुपारी देऊन हेमा उपाध्याय यांची हत्या केल्याचे पुरावे पोलिसांनी सादर करून २२ डिसेंबर २०१५ रोजी त्याला अटक केली.

या दुहेरी हत्येप्रकरणातील अन्य आरोपी शिवकुमार राजभर, प्रदीप कुमार राजभर आणि विजय कुमार राजभर या तिघांनाही हत्या, हत्येचा कट रचणे आणि गुन्हा केल्याचे  पुरावे नष्ट करण्याचा आरोपांखाली दोषी ठरविण्यात आले. दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. वाय. भोसले यांनी सर्व आरोपींना १० वर्षे जन्म ठेपेची शिक्षा सुनावली या शिक्षेला चिंतन याने हायकोर्टात आव्हान दिले असून न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी होणार आहे.

Web Title: Hema Upadhyay murder case; Chintan Upadhyay moves to the High Court against the sentence of birth imprisonment