Join us  

हेमा मालिनीकडे चोरी करणा-या नोकराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 5:31 AM

अभिनेत्री तसेच खासदार हेमा मालिनी यांच्या अंधेरीतील गोडाऊनमध्ये चोरी करून पसार झालेल्या नोकराला जुहू पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या. राजेश चौधरी (४२) असे त्याचे नाव आहे.

मुंबई : अभिनेत्री तसेच खासदार हेमा मालिनी यांच्या अंधेरीतील गोडाऊनमध्ये चोरी करून पसार झालेल्या नोकराला जुहू पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या. राजेश चौधरी (४२) असे त्याचे नाव आहे.जुहू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात हेमा मालिनी यांचे गोडाऊन आहे. यामध्ये त्यांच्या डान्स शोसाठीचे सामान, पुतळे, दागिने आणि कपडे ठेवण्यात येतात. तेथे चोरी झाल्याचे मंगळवारी मॅनेजरच्या लक्षात आले. दरम्यान, बºयाच वर्षांपासून त्यांच्याकडे काम करणारा चौधरी हा नोकर गायब झाला होता. त्याचा मोबाइलही बंद होता. चोरीला गेलेले सामान जवळपास ९७ हजारांचे होते.शुक्रवारी तपासाअंती जुहू पोलिसांनी चौधरीला बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलीस उपायुक्त परमजीतसिंग दहिया यांनी सांगितले. चौधरीने सामान कुठे लपविले याबाबत पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत.

टॅग्स :गुन्हाचोरमुंबई पोलीस