Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना समुपदेशनासाठी महिला आयोगाकडुन हेल्पलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 18:47 IST

महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि पोद्दार फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत समुपदेशन हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. 

मुंबई : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आणि देशातही लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लाॅकडाऊनच्या काळात मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि पोद्दार फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत समुपदेशन हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. 

मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती या चार भाषांमधे सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत या हेल्पलाईन वर संपर्क करता येतो. ही सुविधा मोफत असून स्त्री पुरुष कुणीही संपर्क करु शकतात. १८००१२१०९८० या क्रमांकावर प्रशिक्षित समुपदेशकांशी संवाद साधता येईल. लाॅकडाउनच्या काळात मानसिक स्वास्थ्य जपणे या हेतुने सदर हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. आपल्याला ताण, तणाव, चिडचिड होणे, भीती वाटणे, सतत मुड बदलणे असे त्रास होत असल्यास या काळात आपण या हेल्पलाईनचा उपयोग करु शकतो.

--------------------------

कोरोनाचे थैमान सुरु आहे. या शतकातील सर्वात मोठी आरोग्य विषयक आणिबाणी या आजाराने जगभर निर्माण केली आहे. याचा मानवी जीवनाच्या अनेकविध क्षेत्रांवर मूलगामी आणि दूरगामी परिणाम होत आहेत, होणार आहेत. मानसिक आरोग्यावर देखील याचे विपरीत परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. अनपेक्षितपणे उद्भवलेल्या एखाद्या मोठ्या संकटामुळे अनामिक भीती, चिंता, ताण वाढतो आणि भविष्याबद्दलच्या अनिश्चिततेतून मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मानस मैत्र ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.---------------------------

समितीचे राज्य प्रधान सचिव नंदकिशोर तळाशिलकर  यांनी याबाबत सांगितले की, सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि लॉकडाऊन परिस्थितीत घरातच कोंडले गेल्यासारखी स्थिती असल्याने चिंता, अस्वस्थता वाटणे, स्वत:ची कुटूंबीयांची काळजी वाटणे, ताण येणे, घरात एकट्याच असलेल्या व्यक्तींना अस्वस्थ वाटणे, भविष्याच्या अनिश्चिततेमुळे आणि पुढील काळातील रोजगार, उद्योग व्यवसाय, आर्थिक मंदी या सारख्या प्रश्नांमुळे अनामिक भीती, दडपण येणे या सारख्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा स्वरुपाच्या मानसिक अवस्थेचे पुढे गंभीर आजारात रुपांतर होऊ शकते. पण यावेळी अशा व्यक्तींना आवश्यक भावनिक आधार व धीर मिळाला तर निश्चितच ते या स्थितीतून बाहेर यायला मदत होऊ शकते. खरे तर प्राथमिक स्तरावर त्यांचे मनमोकळे ऐकून घेणे, त्यांना भावनिक, मानसिक आधार व धीर देणे, गरजेनुसार समुपदेशन व त्यानंतर आवश्यकता असल्यास प्रत्यक्ष औषधोपचार अशा याच्या पाय-या आहेत. त्यातील भावनिक आधाराच्या टप्प्यावरच अनेक व्यक्तींना मोठा फायदा होऊ शकतो.----------------------------

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे याचसाठी मानस मित्र हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जेष्ठ मानसोपचार तज्ञ आणि महाराष्ट्र अंनिसच्या मानसिक आरोग्य विभागाचे कार्यवाह डॉ. प्रदीप जोशी (जळगांव) हे या प्रकल्पाचे प्रमूख म्हणून काम बघतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ८० मानस मित्र / मैत्रिणी या हेल्पलाईनमध्ये काम करतात. खान्देश, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम-दक्षिण महाराष्ट्र आणि ठाणे-मुंबई-कोकण अशा पांच विभागात हे काम विभागले आहे. त्या-त्या विभागातील हेल्पलाईनसाठी मानस मित्र / मैत्रिणींचे मोबाईल नंबर समाजमाध्यमांद्वारे पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.-------------------

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस