निराधार मनोरुग्णांसाठी हेल्पलाइन सुरू
By Admin | Updated: March 30, 2015 00:35 IST2015-03-30T00:35:08+5:302015-03-30T00:35:08+5:30
निराधार मनोरुग्णांना आता हेल्पलाईनचा आधार मिळणार आहे.‘नेपच्यून फाऊंडेशन’च्या या संस्थेच्या वतीने हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात

निराधार मनोरुग्णांसाठी हेल्पलाइन सुरू
मुंबई : निराधार मनोरुग्णांना आता हेल्पलाईनचा आधार मिळणार आहे.‘नेपच्यून फाऊंडेशन’च्या या संस्थेच्या वतीने हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला असून या उपक्रमाचे उ्दघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. समाजाकडून दुर्लक्षित झालेल्या निराधार व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी या संस्थेने पुढाकार घेतला आहे. अशा व्यक्तींसाठी हेल्पलाईन सुरू केली असून मनोरुग्णांना मदत केली जाणार आहे. ८८७९८८१२३४ असा हा क्रमांक आहे.