एसटी कर्मचाऱ्यांसाठी हेल्पलाइन

By Admin | Updated: January 24, 2015 22:50 IST2015-01-24T22:50:44+5:302015-01-24T22:50:44+5:30

आपल्या अडचणी मांडण्यास खुला मंच असावा, यासाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने ९०२१२१२००० हा टोल फ्री हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे.

Helpline for ST employees | एसटी कर्मचाऱ्यांसाठी हेल्पलाइन

एसटी कर्मचाऱ्यांसाठी हेल्पलाइन

ठाणे : एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासन अथवा मान्यताप्राप्त संघटनेकडून होणारा अन्याय, अत्याचार, शोषण अथवा इतर व्यक्तिगत समस्या सोडविण्यासाठी व कर्मचाऱ्यांना निर्भयपणे आपल्या अडचणी मांडण्यास खुला मंच असावा, यासाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने ९०२१२१२००० हा टोल फ्री हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे.
एसटी महामंडळाच्या इतिहासात कामगार चळवळीत प्रथमच अशा प्रकारे टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला असून कर्मचाऱ्यांनी केवळ यावर मिस्ड कॉल द्यायचा आहे. त्यानंतर, क्षणात या कर्मचाऱ्यास एक एसएमएस येईल. कर्मचाऱ्यांनी आपली अडचण अथवा तक्रार ेँ२३६ू@ॅें्र’.ूङ्मे या ई-मेलवर पाठवायची आहे. या तक्रारीवर कार्यवाही करून त्या कर्मचाऱ्यास दूरध्वनीद्वारे माहिती मिळेल.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार शासकीय-निमशासकीय व इतर महामंडळांतील कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यंत कमी आहेत. कारण, मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या नाकर्तेपणामुळे व स्वार्थी भूमिकेमुळे कामगारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाप्रमाणे अथवा एमएसईबीप्रमाणे २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी व एसटी महामंडळाविरोधातील प्रस्तावित रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड सेफ्टी अ‍ॅक्ट २०१४ मधील खाजगी टप्पे वाहतुकीला परवानगी देणे व इतर एसटी महामंडळाला मारक असलेल्या अटी व शर्ती वगळण्यात याव्यात. एसटी बँकेच्या आगामी निवडणुकीबाबतचे धोरण व इतर प्रलंबित मागण्यांकरिता इंटकच्या वतीने मिशन २०१५ संघर्ष वर्ष जाहीर करण्यात आले आहे. या वर्षभरात कामगारांच्या न्यायहक्कांसाठी व प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तसेच पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी १ फेब्रुवारी २०१५ रोजी औरंगाबाद येथे राज्यातील सर्व आगार-विभागीय अध्यक्ष, सचिव व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Web Title: Helpline for ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.