हॅलो किंवा वेस्टर्न....मालाड येथे नाल्यात सापडला मृतदेह

By Admin | Updated: September 1, 2014 21:33 IST2014-09-01T21:33:43+5:302014-09-01T21:33:43+5:30

मालाड येथे नाल्यात सापडला मृतदेह

Hello or western .... bodies found in the nall at Malad | हॅलो किंवा वेस्टर्न....मालाड येथे नाल्यात सापडला मृतदेह

हॅलो किंवा वेस्टर्न....मालाड येथे नाल्यात सापडला मृतदेह

लाड येथे नाल्यात सापडला मृतदेह
मालाड: मालाड पश्चिम एव्हरशाईन नगर येथील नाल्यात सोमवारी दुपारी तीन वाजता एका तरूणाचा मृतदेह सापडला आहे. स्थानिक रहिवाशांनी मृतदेहासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली. मृत व्यक्तीचे वय तीस वर्ष असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मृतदेह पूर्णपणे कूजलेल्या अवस्थेत आढळून आला. या व्यक्तीच्या कपड्यांमधून बसचा पास मिळाला आहे, त्यावरून त्याची ओळख पटली असून भास्कर कृष्णन असे या व्यक्तीचे नाव आहे. तो मालवणी येथील रहिवासी आहे. बांगूरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे व शवविच्छेदनासाठी भगवती रूग्णालयात पाठविला आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून पाय घसरून पडला असण्याची शक्यता आहे. त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसून त्याच्या घरच्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती बांगूर नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जवळकर यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Hello or western .... bodies found in the nall at Malad