हॅलो लीड.........
By Admin | Updated: September 26, 2014 23:15 IST2014-09-26T23:15:24+5:302014-09-26T23:15:24+5:30

हॅलो लीड.........
>हॅलो लीड.........जोरदार शक्तीप्रदर्शनासह दिग्गजांचे अर्ज दाखलआज दुपारी तीनपर्यंत अर्ज भरण्यास अवधी शहरातूून ४१ तर उपनगरांत १२४ अर्ज दाखलसचिन अहिर, विनोद तावडे, सुरेश शेी, मंगेश सांगळे, चंद्रकांत हंडोरे, मधूकर चव्हाण यांचे अर्ज दाखलमुंबई: शहरासह उपनगरांतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस उरलेला असताना दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांमध्ये वरळीतून सचिन अहिर, बोरीवलीतून विनोद तावडे, अंधेरी पूर्वमधून सुरेश शेी, विक्रोळीतून मंगेश सांगळे, चेंबूरमधून चंद्रकांत हंडोरे, भायखळ्यातून मधूकर चव्हाण यांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसमोर जुने मित्र उभे राहणार असल्याने या उमेदवारांची धाकधूक स्पष्टपणे दिसून आली. मुंबई शहरातील १० विधानसभा मतदार संघातून एकूण ४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर उपनगरातून २६ मतदारसंघातून १२४ अर्ज दाखल झाले आहेत.वरळी मतदारसंघातून शुक्रवारी राष्ट्रवादीचे आ. सचिन अहीर, शिवसेनेच्या सुुनील शिंदे यांनी मिरवणुकीने अर्ज भरीत शक्तीप्रदर्शन केले. थोड्याफार फरकाने दोन्ही उमेदवार निवडणूक कार्यालयात एकाचवेळी पोहचल्याने कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. मलबारहिल मतदारसंघामध्ये कॉँग्रेसच्या उमेदवार ॲड. सुशीबेन शहा यांनी अर्ज भरला असून भाजपाचे मंगलप्रभात लोढा यांच्यासमोर त्यांनी आव्हान उभे केले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन अहिर यांच्या मिरवणुकीला दुपारी १२ वाजता जांबोरी मैदानातून प्रारंभ झाला. त्यांच्यासमवेत पत्नी संगीता अहिर, प्रसाद लाड आदी उपस्थित होते. शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे देखील लोअर परेळ येथून मिरवणुकीने निवडणूक कार्यालयात पोहोचले. त्यांच्यासमवेत खा. अरविंद सावंत, आशिष चेंबूरकर आदी होते. सुरेश शेींचेही शक्तीप्रदर्शनविद्यमान आमदार सुरेश शेी यांनीही अंधेरी पूर्वेतून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला़ ढोल ताश्यांच्या गजराने व कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने येथील वातावरण काँग्रेसमय झाले होते़ विकास कामांचा मुद्दा पुढे करत आमदार शेी यांनी प्रचाराचा नारळही फोडला़ कुलाब्यात सेना-भाजप आमनेसामनेदक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून शुक्रवारी भारतीय जनता पक्षाचे राज पुरोहित आणि शिवसेनेचे पांडुरंग सकपाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दुपारी एकच्या सुमारास एल्फिन्स्टन तंत्र शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय याठिकाणी या दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीनही प्रमुख पक्षांतील एकाही उमेदवाराने येथून अद्याप अर्ज दाखल केलेला नाही. तर मनसेमधूनही अद्याप कोणत्याही उमेदवाराने अर्ज भरलेला नाही. काँग्रेसने याठिकाणी विद्यमान आमदार ॲनी शेखर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचे धाडस केले आहे. त्यामुळे शनिवारी त्या अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. याउलट राष्ट्रवादीतून येथून उमेदवारी देण्याची शक्यता फारच कमी आहे. तर मनसेतून अद्याप याठिकाणी उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेवटच्या दिवशी मनसे कोणाला उमेदवारी देणार, याबाबत मतदारांत उत्सुकता आहे.मधूकर चव्हाणांचा धडाक्यात अर्ज दाखलभायखळा मतदार संघातून काँग्रेसचे मधूकर चव्हाण यांनी माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्या उपस्थिती काही कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संजय नाईक यांनी शक्तीप्रदर्शन करीत शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवाय या मतदार संघातून बहुजन विकास पार्टीचे प्रवीण पवार आणि समीर चव्हाण यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शिवडी मतदार संघातून बहुजन विकास आघाडीचे अतुल कुरणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे...............................................(चौकट)आज प्रमुख पक्षांचे उमेदवार अर्ज भरणार!मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून गिल्डर लेन येथील महापालिकेच्या शाळेत शुक्रवारी एकही प्रमुख पक्षाच्या उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. याउलट काँग्रेसचे विद्यमान आमदार अमिन पटेल, मनसेचे इम्पितयाज अनिस आणि भाजपचे अतुल शहा येथून शनिवारी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. शिवसेनेतून अद्याप याठिकाणी उमेदवारी निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेवटच्या दिवशी शिवसेना याठिकाणी कोणाला उमेदवारी देणार, यावर येथील चित्र अधिक स्पष्ट होईल. (चौकट)निवडणूक कार्यालयांना यात्रेचे स्वरुपमहायुती आणि आघाडीच्या वादात अडकलेल्या उमेदवारांनी आज निवडणूक कार्यालयांमध्ये अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मानखुर्द येथून चार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर चेंबूरमधून केवळ एकच अर्ज दाखल झाला आहे. उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी असल्याने निवडणूक कार्यालयांना यात्रेसारखे स्वरुप आले होते. चेंबूरमधून आज काँग्रेस उमेदवार चंद्रकात हांडोरे यांनी अर्ज दाखल केला. मानखुर्दमधून शेकापचे रणजीत वर्मा, बहुजन समाज पार्टीतून शेख नसिर करीम यांनी देवनारमधील पालिकेच्या एम पूर्व विभागात असलेल्या निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल केला. दोन्ही ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडवू नयेस, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त याठिकाणी लावला होता. ............................(चौकट)अजित पवारांना जेलमध्ये टाकू- तावडेभारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यावर राष्ट्रवादी पक्षाने केलेले भ्रष्टाचार सिध्द झाल्यास अजित पवारांना जेलमध्ये टाकू असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद तावडेंनी केले. बोरीवली विधानसभा मतदार संघातून निवडणुकीचा उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना तावडे बोलत होते. आमच्या पक्षासमोर अनेक भ्रष्टाचार केलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाला नेस्तनाबूत करणे हेच उदिष्ट आहे. शिवसेनेसोबत युती टिकावी याकरिता आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले, गेले पंचवीस वर्ष शिवसेना आमचा मित्र पक्ष होता, त्यामुळे शिवसेनेच्या कोणत्याही उमेदवारावर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार वैयक्तिक टिका करणार नाही असे तावडे यांनी सांगितले. ..................................