राज्यातील इस्पितळांची उंची वाढणार

By Admin | Updated: January 22, 2015 01:27 IST2015-01-22T01:27:32+5:302015-01-22T01:27:32+5:30

राज्यातील शासकीय व खासगी इस्पितळांची उंची ४५ मीटरपर्यंत वाढवण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाने तयार केला आहे.

The height of hospitals in the state will increase | राज्यातील इस्पितळांची उंची वाढणार

राज्यातील इस्पितळांची उंची वाढणार

मुंबई : राज्यातील शासकीय व खासगी इस्पितळांची उंची ४५ मीटरपर्यंत वाढवण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाने तयार केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला लवकरच मंजुरी दिली जाणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईतील जे. जे., भगवती, शीव येथील लोकमान्य टिळक इस्पितळ अशा काही सरकारी व महापालिका इस्पितळांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईलच. याखेरीज काही खासगी इस्पितळांनाही अतिरिक्त बांधकाम करता येईल. राज्यातील इस्पितळांची उंची वाढवण्याची मागणी गेली काही वर्षे सातत्याने इस्पितळांच्या प्रशासनाकडून करण्यात येत होती. सध्या इस्पितळांची उंची केवळ ३० मीटरपर्यंत मर्यादीत ठेवण्याची कायद्यात तरतूद आहे. जे. जे. इस्पितळाचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव गेली दीड वर्षे हेरिटेज कमिटीकडे पडून आहे. या इस्पितळाची उंची वाढवण्यावर मर्यादा असल्याने त्या इस्पितळाच्या आवारातील हेरिटेज वास्तूचा या पुनर्विकास योजनेत अंतर्भाव करण्यात येणार होता. आता इस्पितळाची उंची वाढवण्यास परवानगी दिल्याने जे. जे.चा रखडलेला पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या ठिकाणी एक हजार अतिरिक्त खाटांची सोय असलेले इस्पितळ उभारण्यात येत आहे. भगवती इस्पितळाच्या जागेवरही एक हजार अतिरिक्त खाटांचे सुसज्ज इस्पितळ उभे करण्यात येत आहे. शीव येथील लोकमान्य टिळक इस्पितळालाही नगरविकास विभागाच्या निर्णयाचा लाभ होणार आहे. बृहन्मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमधील खासगी इस्पितळांनाही या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे.
इस्पितळाची उंची वाढवताना युरोप, अमेरिकेत असलेल्या अग्निशमन यंत्रणा बसवण्याचे बंधन इस्पितळांवर टाकण्यात येणार आहे. पालिकांनी अग्निशमन यंत्रणा बसवल्याची खातरजमा केल्यावरच इस्पितळाच्या वापरास परवानगी दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)

पुनर्विकासांला मोकळीक
च्या निर्णयामुळे मुंबईतील जे. जे., भगवती, शीव येथील लोकमान्य टिळक इस्पितळ अशा काही सरकारी व महापालिका इस्पितळांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईलच. याखेरीज काही खासगी इस्पितळांनाही अतिरिक्त बांधकाम करता येईल.

Web Title: The height of hospitals in the state will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.