राज्यात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:07 IST2021-09-23T04:07:38+5:302021-09-23T04:07:38+5:30

मुंबई : गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली तर तुरळक ठिकाणी जोरदार ...

Heavy rains in the state | राज्यात मुसळधार पाऊस

राज्यात मुसळधार पाऊस

मुंबई : गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील माहितीनुसार, २३ सप्टेंबर रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातदेखील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. विदर्भातदेखील सर्वसाधारणपणे हीच परिस्थिती राहील.

Web Title: Heavy rains in the state