जोरदार पावसाचा रस्ता रेल्वे वाहतुकीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:06 IST2021-07-20T04:06:57+5:302021-07-20T04:06:57+5:30

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली तर ...

Heavy rains hit rail traffic | जोरदार पावसाचा रस्ता रेल्वे वाहतुकीला फटका

जोरदार पावसाचा रस्ता रेल्वे वाहतुकीला फटका

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली तर अनेक भागांत पाणी साचले नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मध्य रेल्वे मार्गावर विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप या स्टेशनवर रेल्वे रुळावर पहाटे पाणी साचले होते. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. काही वेळाने वाहतूक पूर्ववत झाली.

२० मिनिटे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावरील पाण्याचा तातडीने उपसा केला आहे. त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. फक्त मध्य रेल्वे २० मिनिटे उशिराने धावत होती नंतर ती पूर्ववत झाली.

मुंबईतील चेंबूर, विक्रोळी, दादर, सायन आदी भागात पाणी साचले आहे. त्यामुळे दुपारी वाहतूक कोंडी झाली होती तर वेस्टर्न फ्री वे वर सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

Web Title: Heavy rains hit rail traffic