Join us  

मुंबई, ठाण्यासह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात, सखल भागांमध्ये पाणी साचले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 8:17 AM

मुंबई, मुलुंड, ठाण्यासह उपनगरांमध्ये पुढील दोन तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देगेल्या बुधवारी महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. या वादळानंतर मुंबईसह राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे.

मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये आज पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. 

गेल्या बुधवारी महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. या वादळानंतर मुंबईसह राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतील दादर, माटुंगा, सायन, कुर्ला भागात बोरीवलीसह बहुतांश भागात सकाळपासून पावसाने हजेरी लावली. तर गोरेगाव, मालाड, कांदिवली परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. काही भागात रिमझिम पाऊस पडत आहे.

दरम्यान,  मुंबई, मुलुंड, ठाण्यासह उपनगरांमध्ये पुढील दोन तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, डोंबिवली परिसरातही पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. तर भिवंडी परिसरात रात्रीपासून  सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील कल्याण रस्त्यावर पाणी साचले आहे.

टॅग्स :पाऊसमुंबईठाणे