मुंबईत अवकाळी पावसाच्या सरी, नाशिकमध्येही दमदार पाऊस

By Admin | Updated: March 4, 2016 15:06 IST2016-03-04T08:45:24+5:302016-03-04T15:06:45+5:30

मुंबईसह उपनगरे व राज्यातील विविध भागात शुक्रवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर नाशिकमध्ये काल रात्रीपासूनच दमदार पाऊस कोसळत आहे.

Heavy rain in Mumbai, incessant rains in Nashik | मुंबईत अवकाळी पावसाच्या सरी, नाशिकमध्येही दमदार पाऊस

मुंबईत अवकाळी पावसाच्या सरी, नाशिकमध्येही दमदार पाऊस

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - मुंबईसह उपनगरे व राज्यातील विविध भागात शुक्रवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर नाशिकमध्ये काल रात्रीपासूनच दमदार पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच मुंबईतील वातावरण ढगाळ होते, बोरिवली-कांदिवली परिसरात पावसाने हजेरी लावली. तर ठाणे तसेच वसई-विरार भागातही विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या.
अंधेरी, विलेपार्ले, कांदिवली तसेच दादर परिसरातही ढगांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत असून चाकरमान्यांचे मात्र मोठे हाल होत आहेत. पावसामुळे ब-याच ठिकाणी वाहतूक कोंडीही झाल्याचे दिसून येत आहे. 
दरम्यान काल रात्रीपासूनच नाशिक व जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. औरंगाबादमध्येही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.
उष्णतेचा कडाका वाढत असतानाच कोसळलेल्या या पावसामुळे राज्यातील नागरिकांना थोडा थंडावा मिळाला असला तरी या पावसामुळे अनेक पिकांचे व शेतक-यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे.
 
मुंबईसह उपनगरांत पावसाची हजेरी
 
 
 
 
 
 
 

 

Web Title: Heavy rain in Mumbai, incessant rains in Nashik