Join us

अंधेरी MIDCतील इमारतीला भीषण आग, अग्निशामक दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 14:21 IST

अंधेरी एमआयडीसी परिसरातील रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क इमारतीत भीषण आग लागली आहे,

मुंबईः अंधेरी एमआयडीसी परिसरातील रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क इमारतीत भीषण आग लागली आहे, अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अंधेरीतल्या मरोळ MIDCतील एका व्यावसायिक इमारतीला ही आग लागली असून, अग्निशामक दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. अग्निशामक दलानं ही तिसऱ्या स्तरावरची आग असल्याची माहिती दिली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट केलेलं नाही.