मुंबई : कला आणि सामाजिक उपक्रम यांचा संगम असलेला 'हार्टवर्क्स २०२६' (मुंबई आवृत्ती) हा कलाभिमुख सोहळा येत्या १६ आणि १७ रोजी मुंबईत साकारला जाणार आहे. उपक्रमाच्या संस्थापिका फाल्गुनी शेठ कपाडिया, सहसंस्थापिका रचना देवेंद्र दर्डा आणि शिल्पा भगत यांनी या उपक्रमाची स्थापना केली असून, त्यातून हा उपक्रम साकारण्यात आला आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कलाप्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे ७५ हून अधिक कलाकारांच्या १७५ पेक्षा जास्त कलाकृती यामध्ये सादर करण्यात येणार आहेत.
प्रदर्शनात ज्येष्ठ कलाकारांची समकालीन कला तसेच छायाचित्रणाचा समावेश आहे. यासोबतच, मुंबईस्थित हाऊ आर यू फिलिंग स्टुडिओ या डोयेल जोशी आणि नील घोसे बाल्सर या कलाकार जोडीचा 'न्यू डॉन' हा परस्परसंवादी कला अनुभव भारतात प्रथमच सादर करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ग्रॅमी नामांकन प्राप्त संगीतकार अनुष्का शंकर यांचे सहकार्य लाभले आहे. या प्रदर्शनाद्वारे मिळणारा निधी हा दहाहून अधिक महिला नेतृत्वाखालील स्वयंसेवी संस्थांना देण्यात येणार असून, या संस्था बालकल्याण, ज्येष्ठ नागरिकांची काळजी, महिला सक्षमीकरण, प्राणी संरक्षण, ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात कार्यरत आहेत. 'हार्टवर्क्स २०२६' हे केवळ एक कलाप्रदर्शन नसून, सर्जनशील स्वातंत्र्य आणि उद्देशपूर्ण समाजसेवा यांचा संगम साधणाऱ्या दीर्घकालीन चळवळीची सुरुवात आहे. यासंदर्भात 'हार्टवर्क्स'च्या संस्थापिका फाल्गुनी शेठ-कपाडिया म्हणाल्या, ही संकल्पना एका माझ्या स्वप्नातून आणि आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्याशी जोडलेली आहे.
माझ्या ५०व्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण देण्याची माझी इच्छा होती. सुरुवातीला ती केवळ एक कल्पना होती; मात्र या उपक्रमाची पहिली आवृत्ती प्रत्यक्षात साकारताना, उद्देशपूर्ण सर्जनशीलतेतून जग किती उदार होऊ शकते, याची प्रचिती आली. ही केवळ सुरुवात आहे. 'हार्टवर्क्स'च्या सह-संस्थापिका रचना दर्डा यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "फाल्गुनी यांनी जेव्हा प्रथम 'हार्टवर्क्स'ची कल्पना माझ्याशी शेअर केली, तेव्हा काहीतरी आतून बदलल्यासारखे वाटले. कलाकार आणि छायाचित्रकार म्हणून माझा प्रवास, तसेच समुदायासाठी केलेले कार्य अधिक व्यापक आणि अर्थपूर्ण पातळीवर समाजाला परत देण्याची ही संधी आहे.
या सुरुवातीची सहनिर्मिती फाल्गुनी यांच्यासोबत करण्याचा मला अत्यंत आनंद आहे. दरम्यान, हा कार्यक्रम, येत्या १६ आणि १७ जानेवारी रोजी मुंबईत आयएफ. बीई. बॅलार्ड इस्टेट, मुंबई येथे होणार आहे. याची वेळ दुपारी १२ ते सायंकाळी सात अशी आहे. या उपक्रमाला अर्पण, अरज, अन्नम, अपनी शाला फाउंडेशन, आकांक्षा फाउंडेशन, हेल्पिंग हँड्स फाउंडेशन, लिटिल प्लैनेट फाउंडेशन, रक्षा फाउंडेशन, सद्भाव फाउंडेशन, द ओपनट्री फाउंडेशन, टेरे पॉलिसी सेंटर यांचे सहकार्य लाभले आहे.
Web Summary : Mumbai will host 'Heartworks 2026,' an art and social initiative, on January 16th and 17th. Over 75 artists will showcase 175+ works. Proceeds will benefit ten women-led NGOs focused on welfare, empowerment, and conservation. It blends art with social service.
Web Summary : मुंबई में १६ और १७ जनवरी को 'हार्टवर्क्स २०२६' का आयोजन होगा, जो कला और सामाजिक कार्यों का संगम है। ७५ से अधिक कलाकार १७५ से ज़्यादा कलाकृतियाँ प्रदर्शित करेंगे। आय महिला नेतृत्व वाले दस गैर-सरकारी संगठनों को जाएगी, जो कल्याण, सशक्तिकरण और संरक्षण पर केंद्रित हैं। यह कला को समाज सेवा के साथ मिलाता है।