पोलीस संघटनेबाबतच्या याचिकेवर सुनावणी
By Admin | Updated: September 4, 2015 00:46 IST2015-09-04T00:46:16+5:302015-09-04T00:46:16+5:30
खात्याची शिस्त व वरिष्ठांच्या आदेशाने कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संघटना स्थापन करण्याबाबतच्या याचिकेवर उच्च न्यायालयात शुक्रवारी अंतिम सुनावणी होणार आहे.

पोलीस संघटनेबाबतच्या याचिकेवर सुनावणी
मुंबई : खात्याची शिस्त व वरिष्ठांच्या आदेशाने कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संघटना स्थापन करण्याबाबतच्या याचिकेवर उच्च न्यायालयात शुक्रवारी अंतिम सुनावणी होणार आहे. यापूर्वी याबाबतच्या दोन याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. मुंबई व रायगडमधील ६ पोलिसांनी नव्याने याचिका दाखल केली असून, त्याची सुनावणी न्या. गवई व न्या. गडकरी यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.
दोन लाखांवर फौजफाटा असलेल्या पोलीस दलात जवळपास १२ हजार अधिकारी वगळता उर्वरित कॉन्स्टेबल ते सहायक फौजदार पदावर कार्यरत आहेत. पोलीस खात्यात शिस्त व वरिष्ठांच्या आदेशाला महत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्या अधिपत्याखालचे पोलीस संघटित झाल्यास शिस्तीकडे दुर्लक्ष होईल, त्यामुळे त्यांना संघटना काढण्यास परवानगी नाही. त्याबाबतची मागणी प्रलंबित आहे.