सोमवारपासून रोज सुनावणी
By Admin | Updated: September 16, 2015 00:26 IST2015-09-16T00:26:37+5:302015-09-16T00:26:37+5:30
येत्या सोमवारपासून उच्च न्यायालयात अभिनेता सलमान खानच्या हिट अॅण्ड रनप्रकरणाची सुनावणी दररोज होणार आहे. न्या. ए. आर. जोशी यांच्या खंडपीठाने हे मंगळवारी जाहीर केले.

सोमवारपासून रोज सुनावणी
मुंबई: येत्या सोमवारपासून उच्च न्यायालयात अभिनेता सलमान खानच्या हिट अॅण्ड रनप्रकरणाची सुनावणी दररोज होणार आहे. न्या. ए. आर. जोशी यांच्या खंडपीठाने हे मंगळवारी जाहीर केले. त्याचवेळी न्यायालयाने सलमानचा जामीन रद्द करावा व त्याची शिक्षा वाढवावी, अशी मागणी करणारा अर्जही फेटाळून लावला. हा अर्ज सलमानचा दिवंगत सुरक्षारक्षक पोलीस हवालदार रवींद्र पाटील याची आई सुशीलबाई पाटील यांनी केला होता. हिट अॅण्ड रनप्रकरणी सत्र न्यायालयाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा व दंड ठोठावला आहे. त्याविरोधात सलमानने उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली आहे. (प्रतिनिधी)