आरोग्य सेवा कोमात
By Admin | Updated: August 18, 2014 00:03 IST2014-08-18T00:03:50+5:302014-08-18T00:03:50+5:30
तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील रुग्णांना स्थानिक ठिकाणी उपचारच मिळत नाहीत.

आरोग्य सेवा कोमात
मोखाडा ग्रामीण : तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील रुग्णांना स्थानिक ठिकाणी उपचारच मिळत नाहीत. पदरमोड करुन येथील आदिवासींना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे. तालुक्यात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
मोखाडा तालुक्यात खोडाळा, वाशाळा, आसे, मोऱ्हांड अशी चार प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. यामध्ये मोऱ्हाडा येथील प्रथमश्रेणीचे वैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे व आसे येथील वैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे. तालुक्यात परिचारिकांची २२ पदे आहेत, त्यात ८ रिक्त पदांचा समावेश आहे.
दुर्गम भागात पोहचण्यासाठी आरोग्य पथके आहेत, परंतु कारेगाव पथकाला वैद्यकीय अधिकारीच नाही. त्यातच नेहमी होणाऱ्या बैठका यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्याचा ठिकाणच नसतो, तसेच ही रिक्त पदे यामुळे सर्वच आरोग्य केंद्र पोरकी होत आहेत व उपलब्ध सुविधांचा अभाव यामुळे येथील रुग्णांचे उपचाराविना हाल होत आहेत. त्याचसोबत स्वयंसेवक व स्वयंसेविका यांना दिले जाणारे तुटपुंजे मानधन यामुळे त्यांच्यातही नाराजीचा सूर आहे. शासन कुपोषण आटोक्यात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु जर अशी परिस्थती असेल तर हे सांगणे अवघड आहे.