Join us  

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत लवकरच राजीनामा देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 9:49 PM

7 जानेवारीला सावंत यांचा कार्यकाळ संपणार

मुंबई: आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत लवकरच राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 7 जानेवारीला सावंत यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपतो आहे. त्यामुळे ते लवकरच राजीनामा देणार आहेत. सावंत यांच्या जागी संधी मिळावी, यासाठी सध्या शिवसेना नेत्यांकडून जोरदार लॉबिंग करण्यात येत आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून पत्ता कापण्यात आल्यामुळे डॉ. दीपक सावंत यांनी गेल्या वर्षी 4 जुनला राजीनामा दिला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजीनामा थांबवण्याचा सल्ला दिला. यानंतर सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्याआधी त्यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केला होता.मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेनं विलास पोतनीस यांना उमेदवारी देत सावंत यांना डच्चू दिला. विलास पोतनीस हे शिवसेनेचे बोरिवलीचे विभागप्रमुख आहेत. त्यांनी पदवीधर मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसैनिकांमध्ये आणि विशेष करून युवासेनेमध्ये नाराजी होती. त्यामुळे सावंत यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.   

टॅग्स :दीपक सावंतशिवसेनामंत्रीदेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे