Join us
Daily Top 2Weekly Top 5

डिलिव्हरी बॉय बनून तो करायचा चोरी...! गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या; मुंबईत १० गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2023 06:46 IST

ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीच्या डिलिव्हरी बॉयचे कपडे परिधान करून इमारतीत शिरायचा आणि संधी साधून किमती ऐवज चोरायचा

मुंबई :

ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीच्या डिलिव्हरी बॉयचे कपडे परिधान करून इमारतीत शिरायचा आणि संधी साधून किमती ऐवज चोरायचा. अखेर असे कृत्य करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. सुजित तिवारी (२४) असे अटक करण्यात आलेली आरोपीचे नाव आहे. 

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, सुजित हा कांदिवलीतील लालजी पाडा येथील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत चोरी, जबरी चोरी, घरफोडी व खंडणीचे १० गुन्हे नोंद आहेत. २० जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजता सुजित नेहमीप्रमाणे डिलिव्हरी बॉयच्या वेशात  बोरिवलीतील एका इमारतीत शिरून मोबाइल चोरी करून पसार झाला. याप्रकरणी गुन्हा नोंदवत पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासात आरोपी कांदिवलीचा रहिवासी असल्याचे समजताच तपास अधिकारी भरत  घोणे, अभिजित जाधव, तरटे अंमलदार सुर्वे, खताते व देशमुख यांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.

टॅग्स :गुन्हेगारी