‘त्याने’ गळफास घेऊनच केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 05:40 IST2017-08-19T05:40:06+5:302017-08-19T05:40:08+5:30

अंधेरी पोलीस कोठडीत आत्महत्या केलेल्या विजय रमेश साळवीचा मृत्यू गळफासानेच झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघडकीस आले

'He' committed suicide by hanging himself | ‘त्याने’ गळफास घेऊनच केली आत्महत्या

‘त्याने’ गळफास घेऊनच केली आत्महत्या

मुंबई : अंधेरी पोलीस कोठडीत आत्महत्या केलेल्या विजय रमेश साळवीचा मृत्यू गळफासानेच झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा चौकशी करत असून, संबंधित कागदपत्रे अंधेरी पोलिसांनी त्यांच्याकडे अद्याप सुपुर्द केलेली नाहीत.
अंधेरी पोलिसांना त्याचा शवविच्छेदन अहवाल मिळाला आहे. साळवीचा मृत्यू हा गळफासामुळेच झाल्याचे त्यात उघड झाल्याचे परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. मात्र अंधेरी पोलिसांकडून याबाबतची कागदपत्रे मिळत नसल्याने त्यांना तपासात अडचणी निर्माण होत असल्याचे गुन्हे शाखेच्या कक्ष १०मधील एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. याबाबत रेड्डी यांना विचारले असता साळवीप्रकरणी चौकशी गुन्हे शाखेने सुरू केली आहे. साळवीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर अंधेरी पोलीस संबंधित कागदपत्रे गुन्हे शाखेच्या तपास अधिकाºयांना देतील, असे त्यांनी सांगितले.
बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीची पे स्लिप भरून देण्याचे बहाण्याने साळवी आणि त्याच्या साथीदारांनी फसवणूक केली. त्यानंतर त्याच्याकडील रोख रक्कम घेऊन पसार झाले. त्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. अंधेरी पोलिसांनी फसवणूक आणि संगनमत या कलमांखाली त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला. त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार होते. त्यापूर्वी स्वच्छतागृहात जाऊन अंगावरील बनियनच्या साहाय्याने साळवीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Web Title: 'He' committed suicide by hanging himself