‘ते’ कृतिकाचे जवळचे मित्र
By Admin | Updated: June 18, 2017 03:01 IST2017-06-18T03:01:01+5:302017-06-18T03:01:01+5:30
मॉडेल कृतिका चौधरी (२५) हिच्या घराजवळ दिसलेल्या दोघांची ओळख पटली आहे. ते दोघे तिच्या जवळच्या मित्रांपैकी असून त्यांना पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात

‘ते’ कृतिकाचे जवळचे मित्र
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मॉडेल कृतिका चौधरी (२५) हिच्या घराजवळ दिसलेल्या दोघांची ओळख पटली आहे. ते दोघे तिच्या जवळच्या मित्रांपैकी असून त्यांना पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.
कृतिकाच्या घराजवळ ९ जून रोजी दोन अनोळखी इसम दिसले होते, अशी माहिती अंबोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने या दोघांची ओळख पटवत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत
त्यांची चौकशी सुरू केली. हे दोघे कृतिकाच्या जवळच्या मित्रांपैकी आहेत.
आम्ही तिला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलो होतो, मात्र बराच वेळ प्रयत्न करूनसुद्धा तिने फोन उचलला नाही. तेव्हा आम्ही तिथून निघून गेलो, असे त्यांनी पोलीस चौकशीत सांगितले आहे. त्यामुळे प्राथमिक चौकशीत तरी त्यांचा काही हात असल्याचे दिसत नाही; तरीदेखील पोलीस काही तांत्रिक बाबी पडताळून पाहत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
कृतिकाच्या हत्येप्रकरणी या इमारतीमध्ये काम करणाऱ्या नव्या सुरक्षारक्षकाची चौकशी पोलीस करीत आहेत. कृतिकाचा मृतदेह १२ जून रोजी तिच्या राहत्या घरी सापडला होता. शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना कळविले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.