मुंबई : पाच महिने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर व्यावसायिकाने पोलीस ठाणे गाठून हॉटेल मालक, त्याच्या कर्मचाºयाने मारहाण करत लुटल्याचा आरोप केला. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.२६ जूनला ही घटना घडली होती. सलीम अब्दुल रेहमान शेख (४९) असे व्यावसायिकाचे नाव असून ते कार वितरक म्हणून काम करतात. अंधेरी पूर्वेतील एका बारमधील मालक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली. ते वाशीवरून नवी मुंबईला जात असताना, आरोपींनी त्यांना थांबवून त्यांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यास सुरुवात केली. त्यांनी जाब विचारताच त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील ५० हजार रुपयांसह सोन्याची चेन काढून घेतल्याचा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पाच महिन्यांनी शुद्ध येताच त्यानं थेट पोलीस ठाणं गाठलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 06:23 IST