Join us

गावठी कट्टे विकणारे चौघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:30 IST

पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेल्या आॅपरेशन आॅलआउट दरम्यान मेनरोडवरील सिल्व्हर टॉवरसमोरील पार्किंगमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणाऱ्या चौघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या चौघांनीही मध्य प्रदेशातील उंबरठी येथून गावठी कट्टे विकत आणल्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून तीन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसे जप्त केली आहे.

ठळक मुद्देमोबाइल चोरट्यासह धारदार शस्त्र बाळगणाराही अटकेत

नाशिक : पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेल्या आॅपरेशन आॅलआउट दरम्यान मेनरोडवरील सिल्व्हर टॉवरसमोरील पार्किंगमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणाऱ्या चौघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या चौघांनीही मध्य प्रदेशातील उंबरठी येथून गावठी कट्टे विकत आणल्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून तीन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसे जप्त केली आहे.पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये म्हसरूळ येथील सागर पवार, पंचवटीतील प्रथमेश खैरे, विराणे येथील अनिल तात्याभाऊ मोहिते (१९) व निफाडच्या नैताळे येथील अनिल दत्तू पवार या चौघांचा समावेश आहे. सागर पवारने जळकू (ता.मालेगाव) येथे लपवून ठेवलेला गावठी कट्टा काढून दिला आहे. मल्हारखाण, नाशिक येथील मित्र किशोर बरू यास एक गावठी कट्टा दिल्याची त्याने कबुली दिली, तर कामटवावाडच्या राजवाडा भागातून विनोद माधव मगर याच्या राहत्या घरातून तलवारी, चाकू, कोयते, सुरे, जांबिया अशाप्रकारचे ११ प्राणघातक हत्यारे जप्त करण्यात आले असून विनोद मगर यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :नाशिक पोलीस आयुक्तालयअटक