बोरीवलीच्या हर्षिता वायंगणकरला राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत सुवर्णपदक! क्रीडा मंत्र्यांनी केला सत्कार
By मनोहर कुंभेजकर | Updated: September 14, 2023 13:54 IST2023-09-14T13:52:34+5:302023-09-14T13:54:17+5:30
मल्लखांब खेळाडू कुमारी हर्षिता वायंगणकर हिने राष्ट्रीय खेलो इंडिया मल्लखांब स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

बोरीवलीच्या हर्षिता वायंगणकरला राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत सुवर्णपदक! क्रीडा मंत्र्यांनी केला सत्कार
मुंबई : महाराष्ट्र एनसीसीच्या कॅडेट पैकी बोरीवली ( पूर्व) येथील एक राष्ट्रीय पातळीवरील मल्लखांब खेळाडू कुमारी हर्षिता वायंगणकर हिने राष्ट्रीय खेलो इंडिया मल्लखांब स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. याबद्दल महाराष्ट्राचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी तिचा विशेष पारितोषिक देऊन तिचा गौरव केला. या प्रसंगी इतर मान्यवर उपस्थित होते.
राकेश वायंगणकर यांच्या नेतृत्वाखाली बोरीवली( पूर्व) येथील जय महाराष्ट्र नगर येथे वायंगणकर साई स्पोर्ट्स असोसिएशन कार्यरत असून या असोसिएशन तर्फे राष्ट्रप्रेमाचे, देशहिताचे विविध प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात.
राकेश वायंगणकर,पल्लवी राकेश वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कन्या हर्षिता आणि रुचिता वायंगणकर या दोन्ही भगिनींना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पारितोषिके मिळाली आहेत. परमवीर चक्र सन्मानित मधुसूदन सुर्वे, लष्करी अधिकारी सनी शिगवण आदी मान्यवरांचे मार्गदर्शन सातत्याने वायंगणकर साई स्पोर्ट्स या संस्थेला लाभत असते, अशी कृतज्ञता वायंगणकर यांनी व्यक्त केली.