हरमित सिंग ठरला ‘मुंबई श्री’
By Admin | Updated: April 15, 2017 00:49 IST2017-04-15T00:49:20+5:302017-04-15T00:49:20+5:30
चुरशीच्या लढतीत आकर्षक शरीरयष्टीचे उत्कृष्ट प्रदर्शन करताना हरमित सिंगने ‘मुंबई श्री २०१७’ किताब पटकावला. तसेच, बेस्ट पोझरसाठी अमित सिंग आणि बेस्ट

हरमित सिंग ठरला ‘मुंबई श्री’
मुंबई : चुरशीच्या लढतीत आकर्षक शरीरयष्टीचे उत्कृष्ट प्रदर्शन करताना हरमित सिंगने ‘मुंबई श्री २०१७’ किताब पटकावला. तसेच, बेस्ट पोझरसाठी अमित सिंग आणि बेस्ट इम्प्रुव्ह बॉडी पुरस्कारासाठी विराज सरमळकरची निवड झाली.
मुंबई जिल्हा बॉडी बिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशन आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने अंधेरीत झालेल्या स्पर्धेचे क्रांती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १०० शरीरसौष्ठपटूंनी सहभाग घेतला. यामध्ये बॉडीफ्लेक्स संघाच्या खेळाडूंनी एकहाती वर्चस्व
राखले.
५५ किलो गटात नितीन देहरीकर (गोल्ड जिम), ६० किलो गटात सचिन कासले (बॉडीफ्लेक्स), ६५ किलो गटात जगेश दैत (जे. डी. फिटनेस), ७० किलो गटात अमित सिंग (बॉडीफ्लेक्स), ७५ किलो गटात वाहीद बांबूवाला (बॉडीफ्लेक्स) यांनी बाजी मारली. (क्रीडा प्रतिनिधी)